विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षकांनी झोकून काम केले पाहिजे- संतोष पाटील
कुरुल (कटूसत्य वृत्त):- आजचा विद्यार्थी हा उद्याच्या देशाचा नागरिक आहे. त्याला घडवण्याची पहिली जबाबदारी शिक्षकांवर असून आई-वडिलांपेक्षा त्याचा जास्तीचा वेळ शाळेच्या सानिध्यात जातो. त्यामुळे त्या बालमनावर जितके जास्त चांगले संस्कार करता येतील तेवढे केले पाहिजे. कारण हाच विद्यार्थी उद्या शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल करत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षकांनी झोकुन काम करत विद्यार्थी घडविले पाहिजे असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल घोडेश्वर येथील उपक्रमशील शिक्षक संतोष पाटील यांनी केले.
सोहाळे (ता. मोहोळ) येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचे वाटप उपक्रमशील शिक्षक संतोष पाटील यांच्या स्वखर्चातून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पुण्यनगरी चे प्रतिनिधी सुहास घोडके, ग्रा. पं. सदस्य चंद्रकांत बचुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवृत्ती जगताप, उपाध्यक्ष अलताफ मुलाणी, समाधान जगताप, प्रविण सोनवणे आदी उपस्थित होते.
दरम्यान, विदेशी देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांकडून संतोष पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संजय गावडे, प्रभाकर माने, वर्षा माने, संतोष अंकुश, अश्फाक शेख, सतीश राठोड आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments