श्री सिद्धेश्वर यात्रा शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिद्धेश्वर महायात्रा–२०२६ शांततेत, सुरक्षिततेने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने व्यापक पूर्वतयारी व कृती आराखडा (Action Plan) तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मा. आयुक्त,डॉ. सचिन ओम्बासे सोलापूर महानगरपालिका यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा–२००५ अंतर्गत या महायात्रेसाठी Incident Commander म्हणून नियुक्ती केली आहे.
या अनुषंगाने मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता इंद्रभवन इमारत, सोलापूर महानगरपालिका येथे उच्चस्तरीय समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री धर्मराज काडादी,नगर अभियंता सारिका आकूलवार,महावितरण कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत माळपोरे, संदीप कोंडगुळे,आरोग्य अधिकारी राखी माने, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, नियंत्रण अधिकारी एक अतिक्रमण विभाग तपंन डंके, मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे, सह.अभियंता विभागीय कार्यालय श्री सावंत, अन्न व औषध प्रशासन अधिकारी श्रीमती पाटील मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुधीर खिराडकर, शाखा अभियंता एम एस पवार, विश्वस्त रतन रिक्के, बाळासाहेब भोगडे, प्रकाश बिराजदार, सुरेश म्हेत्रे कुंभार,कार्यकारी अभियंता अजय कुमार भोसले, वैद्यकीय अधिकारी सिविल हॉस्पिटल डॉ.धनंजय गायकवाड, डीएमएमएस जिल्हाधिकारी कार्यालय अर्चना बिशोई,बीएसएनएलचे शेखर माळगे होते.बैठकीतील प्रमुख निर्णय व कृती आराखडा देवस्थान व यात्रा समितीची जबाबदारी :
यात्रा कालावधीत तसेच अक्षता सोहळ्याच्या दिवशी स्थानिक वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्राकाळात एलईडी स्क्रीन उभारणे, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, स्वतंत्र कंट्रोल रूम उभारणे, वाहनतळ (पार्किंग) व्यवस्था करणे तसेच सर्व स्टॉलमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. देवस्थानच्या वतीने सगळीकडे बॅटिंग करणे व त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे त्याचबरोबर यात्रेच्या काळात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावणे. यात्रेच्या काळामध्ये तलावाच्या बाजूला बॅरिगेटीन करणे व सुरक्षारक्षक नेमणे. मनोरंजन नगरी येथील पाळणे उभे करण्यात येणार असून त्या ठिकाणी एक समिती नेमून स्ट्रक्चर स्टॅबिलिटी संपूर्ण माहिती घेणे. त्यासंदर्भातली संपूर्ण माहिती महापालिकेला सादर करणे.
पोलीस विभाग :
अक्षता सोहळा व सर्व कार्यक्रमस्थळी गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, समन्वयक अधिकारी (सुपरवायझर) नेमणूक, बॅरिकेड्स लावणे, ‘नो पार्किंग झोन’ घोषित करणे व आपत्कालीन मार्गांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.
महापालिकेची कामे :
होम मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या मनोरंजन नगरीसाठी प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग तसेच आपत्कालीन प्रसंगी तात्काळ बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गाची व्यवस्था करण्यात येणार आहे. परिसराची नियमित स्वच्छता, शक्य त्या ठिकाणी मॅट टाकणे, रोलिंग करणे, धूळ प्रदूषण टाळण्यासाठी दररोज पाणी मारणे, तसेच २४ तास कार्यरत कंट्रोल रूम, आपत्कालीन मदत कक्ष व प्रतिसाद केंद्र उभारण्यात येणार आहे. याठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी व अग्निशमन दलाची वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
नंदीध्वज मिरवणूक मार्ग :
मिरवणूक मार्गाची स्वच्छता, मार्गावरील झाडांच्या फांद्या, केबल वायर इत्यादी अडथळे दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ :
धूळ प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दिवसातून दोन वेळा पाणी मारणे, मॅटिंग व रोलिंग करणे, होम मैदानावर वाळू टाकणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यात्रेदरम्यान दररोज तपासणी करून अहवाल मा. जिल्हाधिकारी, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी व संबंधित कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. प्रदूषण मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. धूळ प्रदूषण मोजण्यासाठी तीन ठिकाणी प्रदूषण मोजणी यंत्र बसवण्यात येणार आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभाग :
यात्राकाळात शहरातील व यात्रेतील सर्व हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल्सची दररोज तपासणी करण्यात येईल. भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री होणार नाही याची खात्री केली जाईल व अन्नविषबाधा होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येईल. सर्व अन्न विक्रेत्यांची पत्ता असलेली यादी देवस्थान व यात्रा समितीमार्फत संबंधित विभागास देण्यात येणार आहे. तात्पुरत्या दुकानांसाठी सुरक्षित अंतराची मर्यादा पाळण्याचे निर्देश देण्यात आले.
मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बैठकीत सांगितले की, “महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाही श्री सिद्धेश्वर महायात्रा–२०२६ शांततेत, सुरक्षिततेने व भाविकांच्या सोयीसाठी पार पाडण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.”
श्री सिद्धेश्वर महायात्रा–२०२६ यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध व वेळेत कामे पूर्ण करावीत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री धर्मराज काडादी,महावितरण कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत माळपोरे, संदीप कोंडगुळे,आरोग्य अधिकारी राखी माने, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, नियंत्रण अधिकारी एक अतिक्रमण विभाग तपंन डंके, मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे, सह.अभियंता विभागीय कार्यालय श्री सावंत, अन्न व औषध प्रशासन अधिकारी श्रीमती पाटील मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुधीर खिराडकर, शाखा अभियंता एम एस पवार, विश्वस्त रतन रिक्के, बाळासाहेब भोगडे, प्रकाश बिराजदार, सुरेश म्हेत्रे कुंभार,कार्यकारी अभियंता अजय कुमार भोसले, वैद्यकीय अधिकारी सिविल हॉस्पिटल डॉ.धनंजय गायकवाड, डीएमएमएस जिल्हाधिकारी कार्यालय अर्चना बिशोई,बीएसएनएलचे शेखर माळगे आदी मन्यावर उपस्थिती होते.

0 Comments