Hot Posts

6/recent/ticker-posts

केंद्रीय मंत्री आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान

 केंद्रीय मंत्री आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान




अकलूज (कटूसत्य वृत्त):- रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृध्दाश्रम गोपाळपूर येथे मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमारजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

आयोजक तालुका कार्याध्यक्ष सचिन कुमार भोसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी रीपाइंचे पश्चिम महाराष्ट्र नेते आप्पासाहेब जाधव तसेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब कसबे, तालुका अध्यक्ष संतोष पवार, शहर अध्यक्ष कीर्तिपाल सर्वगोड, दयानंद बाबर,शैलेश झेंडे ,अर्जुन इंगळे, विजय वाघमारे, भैया फडतरे,प्रमोद बाबर, दत्ता वाघमारे, अण्णा कांबळे, लक्ष्मण गायकवाड, योगेश माने, नामदेव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी तालुका कार्याध्यक्ष सचिन कुमार भोसले हे विविध कार्यक्रम राबवत असतात. दलित चळवळी मध्ये कुमार भोसले यांचे योगदान अनमोल समजले जाते. आजपर्यंत त्यांनी एक नेता एक पक्ष अशी निष्ठा जोपासली आहे. त्यांची मुलेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य करताना दिसतात. सामाजिक कार्यात या भोसले कुटुंबांनी आजपर्यंत अग्रेसिव भूमिका निभावली आहे. आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ते प्रत्येक वर्षी अन्नदानाचा कार्यक्रम राबवतात. याशिवाय विविध कार्यक्रम घेऊन केंद्रीय मंत्री आठवले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments