Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरच्या पोलिस आयुक्तांची धडक कारवाई! 4 दिवसाला 1 तडीपार

 सोलापूरच्या पोलिस आयुक्तांची धडक कारवाई! 4 दिवसाला 1 तडीपार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी २०२५ मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शहरात सात पोलिस ठाण्यांकडून शरीराविषयक व मालाविषयक गुन्हे दाखल असलेल्यांची यादी मागवून पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजय कबाडे यांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

त्यात एकूण चार हजार ५४२ जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ५५, ५६ व ५७ नुसार ८३ सराईत गुन्हेगारांना या वर्षात तडीपार केले आहे. शरीराविषयक गुन्हे करणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक जणांकडून एक वर्षाच्या मुदतीचे अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे. तर गर्दीच्या ठिकाणी संशयितरीत्या फिरणारे, मालाविषयक गुन्हे करणारे, हातभट्टी विकणारे, बंधपत्र घेऊनही त्याची रक्कम जमा न करणाऱ्यांवर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे.

शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी तडीपार, एमपीडीए अंतर्गत कारवाया करून त्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील एक हजाराहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments