Hot Posts

6/recent/ticker-posts

'एमआयएम' 16 ते 21 डिसेंबर अर्ज स्वीकारणार- शौकत पठाण

 'एमआयएम' 16 ते 21 डिसेंबर अर्ज स्वीकारणार- शौकत पठाण


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून मंगळवार, दिनांक 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत इच्छुकांना अर्ज देणे व ते स्वीकारण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

मौलाली चौक येथील एमआयएमच्या कार्यालयात इच्छुकांना अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जाची किंमत 500 रुपये असून कुठल्याही जाती-धर्माचे लोक अर्ज घेऊ व भरू शकतात. एमआयएमतर्फे महापालिका निवडणुकीसाठी सुमारे 30 जागा लढवण्याचा मानस आहे. 

या पक्षाचे प्रभाग क्रमांक 14, 16, 17,20, 21व 22 यामध्ये प्रभाव आहे. या विविध प्रभागांमध्ये निवडणूक लढण्यावर पक्षाकडून भर देण्यात येणार आहे. विविध राजकीय पक्षातील अनेक नाराज घटक एमआयएमकडून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत.  त्यामुळे एमआयएमकडून यंदा जास्त जागा लढण्यात येतील. 

पक्षाकडून 100 उमेदवारी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते सोलापुरात प्रचारासाठी येणार आहेत, असेही शौकत पठाण यांनी यावेळी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments