Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार महर्षि कारखान्याचे शेती अधिकारी यांचा प्रथम क्रमांक

 सहकार महर्षि कारखान्याचे शेती अधिकारी यांचा प्रथम क्रमांक




अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित, मुंबई यांचे वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त सहकारी साखर कारखान्याचे कामगारांकरिता राज्यस्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी  समाधान उर्फ रविराज शिवाजी चव्हाण यांनी "सहकारातून समृद्धी" पोस्टर सादर केले होते. सदर पोस्टर्सला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून यामुळे शेती अधिकारी यांनी सहकार महर्षि कारखान्याची शान वाढविली आहे.

सदर स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा सोमवार दि.२४/११/२०२५ रोजी सीएसीपीचे अध्यक्ष,  विजय पॉल शर्मा, राष्ट्रीय सहकारी संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे शुभहस्ते पुणे येथे संपन्न झाला. यावेळी जयप्रकाश दांडेगावकर, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, लेखक व अर्थतज्ञ अच्युत गोडबोले, व्हीएसआयचे डायरेक्टर जनरल संभाजी कडू-पाटील, मंगेश तिटकारे, साखर संघ उपाध्यक्ष प्रताप ओहोळ व साखर संघ कार्यकारी संचालक संजय खताळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याअनुषंगाने शेती अधिकारी रविराज चव्हाण यांचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील व्हाईस चेअरमन शंकरराव रामचंद्र (आबासाहेब) माने-देशमुख, संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील तसेच संचालक व खातेप्रमुख यांनी अभिनंदन केले.

या विविध स्पर्धेमध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे इतर १० कामगार सहभागी झाले होते त्यांनाही निवड श्रेणीमध्ये मान मिळाला आहे.

शेती अधिकारी समाधान उर्फ रविराज चव्हाण यांना वैयक्तीक मिळालेल्या बक्षिसामुळे कारखाना कामगार, उस उत्पादक सभासद व तोडणी वाहतूकदार तसचे हितचिंतक यांचेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments