श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने दिली विद्यार्थ्यांना मायेची ऊब
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या दशकवर्षपूर्तीनिमित्त उपक्रमांतर्गत बी.सी.बॉईज हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना चादर वाटप करून मायेची ऊब दिली. कडाक्याची थंडी असल्याने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
‘श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान’च्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे लाईन परिसरातील बी.सी. बॉईज होस्टेल येथे विद्यार्थ्यांना सोलापुरी चादर वाटप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. येथील ५ वी ते १० वीपर्यंतचे विद्यार्थी या वसतिगृहात राहतात. मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने प्रतिष्ठानने या विद्यार्थ्यांना चादर वाटप केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सचिव ॲड. मीरा प्रसाद सिंग, जिल्हा ग्रामीण यंत्रणाचे सहाय्यक लेखाधिकारी सूर्यकांत तोडकरी, बी.सी.बॉईज होस्टेलचे व्यवस्थापक शंकर म्हमाणे, श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट उपस्थित होते.
श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त हा सहावा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थी दत्तक योजना, सेनेटरी पॅड वितरण, स्टील पाणी टाकी स्थापन, अन्नदान, दिवाळी फराळ वाटप, गोरगरीब व वंचितांसाठी मदत अशा विविध उपक्रमांची माहिती संस्थापक महेश कासट यांनी प्रास्ताविकातून दिली. सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले तर आभार प्रदर्शन विक्रम बायस यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अलकुंटे, महेश ढेंगळे, प्रकाश आळंगे, दीपक करकी, गणेश माने, श्लोक सक्करगी, सौरभ लकडे, श्रीरंग रेगोटी, अभिजित व्हनकळस, अक्षता कासट, मनुश्री कासट, श्रेया लंचके, श्रीनिधी जाधव, शीला तापडिया, शुभांगी लंचके, सुजाता सक्करगी, अर्चना बंडगर, प्रियंका जाधव आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सोलापुरी चादर ही खरी मायेची भेट : ॲड. मीरा सिंग
“श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत अभिमानास्पद आहे. थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांना उब देणारी सोलापुरी चादर ही खरी मायेची भेट आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता,” असे मत ॲड. मीरा सिंग यांनी व्यक्त केले.
.png)
0 Comments