Hot Posts

6/recent/ticker-posts

पहिल्या दिवशी पंढरपूर नगरपरिषदेसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल

 पहिल्या दिवशी पंढरपूर नगरपरिषदेसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आणि अनगर एकमेव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सुरु झाली असून सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी पंढरपूर नगरपरिषद वगळता इतर कोणत्याही ठिकाणी नगराध्यक्ष अथवा नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झालेला नाही. तर पंढरपूर नगरपरिषदेसाठी एकमेव अर्ज दाखल झाला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, अकलूज, पंढरपूर, मंगळवेढा, दुधनी, मैंदर्गी, अक्कलकोट, करमाळा, अनगर, बार्शी, कुर्डुवाडी, सांगोला या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी सोमवार १० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. तर निवडणूकीसाठी कार्यालये ही सज्ज झाली आहेत. मात्र विविध राजकीय पक्षाकडून उमेदवारीचे स्पष्ट संकेत अनेकांना मिळालेले नाहीत

त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांनी तयारी केली असली तरी अर्ज दाखल करण्यासाठी वेट आणि वॉच ची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. तर यंदा नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या त्या राजकीय पक्षाचा प्रमुख उमेदवार जाहिर झाल्याशिवाय इतर उमेदवारांनाही अर्ज दाखल करण्यास राजकीय पक्षांनी हिरवा कंदील दिला नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे उमेवारांना पहिल्यांदा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर त्यांची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आणून देणे अपेक्षित आहे. त्याचाही अडथळा अनेकांना आहे. त्यामुळे मंगळवारपासून अर्जांची संख्या वाढेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments