Hot Posts

6/recent/ticker-posts

सोपल विरुद्ध राऊत – बार्शीत दोन बलाढ्य गट आमने-सामने

 सोपल विरुद्ध राऊत – बार्शीत दोन बलाढ्य गट आमने-सामने
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  माढा तालुक्यात शेती, स्थानिक कला, संस्कृती आणि ग्रामीण उद्योग-व्यवसायांना नवी दिशा देण्यासाठी माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि आमदार अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव *गुरुवार, 19 ते रविवार, 23 नोव्हेंबर*दरम्यान सहकारमहर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद हायस्कूल, माढा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा आमदार अभिजित पाटील यांनी स्वतः घेतला. त्यांनी स्टेज पूजन करून कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. यावेळी माढा शहरातील विविध राजकीय नेते, मान्यवर आणि आयोजक मंडळ उपस्थित होते.
या महोत्सवात कृषी क्षेत्रातील आधुनिक प्रगती, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीशी निगडित उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महोत्सवात:
* कृषी यंत्रसामग्री
* बी-बियाणे, खते
* शेतीपूरक उद्योग
* जलव्यवस्थापन
* दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन
* कृषी प्रक्रिया उद्योग
यांची प्रदर्शनं भरविण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी: तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र,कार्यशाळा, व्याख्यान, शासकीय योजनांची माहिती, प्रत्यक्ष लाभ नोंदणी.यांचा समावेश असून, शेतकऱ्यांना एका ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध होण्याची संधी मिळणार आहे.
महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होईल. लोककला, नृत्य, नाट्यप्रयोग, संगीत मैफिली, बालरंजन आणि विविध मनोरंजक उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. तरुणांना प्रेरणादायी आणि रोजगाराभिमुख संधीही या माध्यमातून मिळणार आहेत.
महिला उद्योजकांसाठी विशेष संधी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना आणि महिला व्यवसायवृद्धीसाठी:
 महिला बचत गट, स्थानिक उद्योजिका यांच्यासाठी विशेष स्टॉल, मार्गदर्शन आणि व्यवसायवृद्धीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
माढा, पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव, महिला बचत गट, व्यापारी, युवा आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अभिजित पाटील यांच्यावतीने विठ्ठल प्रतिष्ठानने केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments