सरताज सर्फराज सय्यद यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग नऊची समीकरणे बदलली
सरताज सय्यद यांच्या प्रचारामुळे शहराच्या दक्षिण भागात शिवसेनेचा धनुष्यबाण ठरतोय पुन्हा फेमस
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील सर्वसामान्यांचा प्रभाग असलेल्या आणि हाय प्रोफाईल ठेकेदारीसाठी चर्चेत आलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधील राजकीय समीकरणे दर दिवसाला बदलताना जाणवत आहेत. या प्रभागातून यापूर्वीपासूनच सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सर्फराज सय्यद हे आपल्या सुविद्य पत्नी सरताज यांना शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार अशी खात्री अनेकांना झाली. सर्फराज यांना मोहोळचे आमदार राजू खरे शिवसेनेचे ओबीसी विभागाचे राज्याचे नेते रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली उमेदवारी प्राप्त झाली.
प्रभाग नऊ मध्ये प्रभाग क्रमांक पंधरा शिवसेनेच्या म्हणजे उबाठा पक्षाच्या ताब्यात तर प्रभाग क्रमांक चौदा हा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. प्रभाग 14 आणि 15 मधील समस्या गेल्या नऊ वर्षापासून म्हणजे नगरपरिषदेच्या स्थापनेपासून आजतागायत कायम आहेत. या प्रभागातील सांडपाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर अन्य आरोग्य विषयक सोयीसुविधा अभावी सर्वसामान्यांची होत असलेली हेळसांड पाहून यापूर्वीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना प्रभागातील जनता वैतागली आहे. या संतापाच्या उद्रेकातूनच आणि या प्रभागातील उदासीन राजकारणातूनच शिवसेना शिंदे पक्षाच्या सरताज सय्यद यांच्या उमेदवारीचा मोठा पर्याय सर्वसामान्यांसमोर आला आहे.
चौकट
मोहोळ शहरातील सर्वाधिक बकाल आणि सोयी सुविधा नसलेला प्रभाग म्हणून पटकन प्रभाग ९चे नाव डोळ्यासमोर येते.अनेक महिन्यापासून नाही तर चार वर्षापासून
या प्रभागातून असंतोषाचा मोठा उद्रेक जाणवत आहे. विशेष भाग म्हणजे या प्रभागातील रस्ते इतके निकृष्ट दर्जाचे आणि दलदलीचे चिखलाचे असतात की प्रभागात काय चालले हे पाहण्यासाठी देखील प्रभाग चौदा मधील पदाधिकाऱ्यांना या प्रभागाकडे हायप्रोफाईल आणि आलिशान गाडी आणता येत नाही यापेक्षा या प्रभागातील कागदोपत्री विकासाचे दुर्दैव काय? असा सवाल या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. प्रचाराच्या दरम्यान सर्फराज सय्यद आणि सरता सय्यद यांनी प्रभागात सगळे नीट हवे असेल तर धनुष्यबाण चिन्हावरच विश्वास ठेवावा असे आवाहन केले.

0 Comments