राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रत्येक भारतीयांचा आधारस्तंभ आणि राष्ट्राचे मार्गदर्शक असलेल्या भारतीय संविधानाच्या स्वीकृतीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयराव कोळेकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी संविधान म्हणजे केवळ कायदे नसून ते कोट्यावधी भारतीयांच्या आशा, आकांक्षा दर्शविणारे पवित्र दस्तऐवज आहे असे प्रतिपादन श्री कोळेकर सर यांनी केले. या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधान प्रस्ताविकेचे वाटप करून सार्वजनिक संविधान प्रस्ताविका वाचन करण्यात आले.
याप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयराव कोळेकर किरण परदेशी सर हनुमंत रासकर सर ,पप्पू राठोड सर, रुपेश मोरे सर ,विलास पाटील सर, अॅड.सुहास कानगुडे सर,सरडे सर, श्रीमती राठोड मॅडम, ज्ञानेश्वर पवार, राहुल पवार, प्रकाश कांबळे, भास्कर पवार तसेच विद्यालयातील विद्यार्यी विद्यार्थीनी उपस्थित होते.

0 Comments