Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथील यश करिअर अकॅडमीच्या तरुणांनी शेळ्या चोरणाऱ्या तरुणांना केले पोलिसांच्या स्वाधीन

 नातेपुते येथील यश करिअर अकॅडमीच्या तरुणांनी शेळ्या चोरणाऱ्या तरुणांना केले पोलिसांच्या स्वाधीन 
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सध्या चोऱ्यांच्या प्रमाणात थंडीमुळे वाढ झाली असून कोण काय चोरून घेऊन जाईल याचा भरोसा राहिला नाही. सध्या मटणाचे दर वाढल्याने शेळ्या मेंढ्यांच्या दरात ही खूप मोठी वाढ झाली असल्याने अशीच शेळ्या चोरीची एक घटना नातेपुते शिखर शिंगणापूर चौक येथे घडल्याने समोर आली आहे, मात्र यात नातेपुते येथील यश करिअर अकॅडमीचे मेजर अनिल माने व त्यांचे विद्यार्थी युवकांनी त्या चोरट्यांचा पाठलाग करून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ :३० वाजण्याच्या दरम्यान नातेपुते येथील यश करिअर अकॅडमीचे मेजर अनिल माने हे अकॅडमीतील पोलीस भरतीसाठी सराव करणारे विद्यार्थी घेऊन शिखर शिंगणापूर चौक येथे असणाऱ्या ४०० मीटर ट्रॅक वर सराव करून तेथील सर्व विद्यार्थी ५ किलोमीटरचा सराव करण्यासाठी रस्त्यावर पळत होते. तेवढ्या वेळात फलटण कडून नातेपुते येथे आठवडा बाजारासाठी १ ) विशाल अशोक पवार वय २४, २ ) संदीप अशोक भोसले वय २५ हे दोघे रा.अलगोडवाडी फलटण ३ )जयेश रावसाहेब मलगुडे वय २९ रा. लोणंद, ४ ) किरण काळे रा. फलटण हे मोटरसायकल क्रमांक एम.एच.५३ डी. १६९८ व एम.एच. ४२ एन. ९७२६ या मोटरसायकलवर चोरीच्या दोन शेळ्या विक्रीसाठी घेऊन येत असता शेळी मालक रोहित लोंढे रा.सांगवी ता. फलटण याने गाडीवर आपल्या शेळ्या असल्याचे ओळखल्याने आरडाओरडा केली व चोर चोर असे ओरडल्याने वरील चार इसम गाडी वळवून गाडी वेगाने पळू लागले तेवढ्यात पोलीस भरतीचा सराव असणारे यश अकडमी चे तरुण विद्यार्थी यांनी त्या गाडीचा पळतच थरारक असा पाठलाग करून त्या चौघांना पकडले मेजर अनिल माने यांनी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांना भ्रमणध्वनी द्वारे सदर घटनेबाबत कळविले असता त्या ठिकाणी नातेपुते पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुभाष गोरे कल्याण भोईटे सरकारी वाहन घेऊन तातडीने घटनास्थळी आले. त्या अगोदर शेळीचे मालक रोहित लोंढे यांनीही फलटण पोलीस यांना फोन द्वारे कळविले होते. त्या ठिकाणी फलटण चे पोलीस कर्मचारी संजय अडसूळ, व ओमासे हे ही घटनास्थळी सरकारी वाहन घेऊन त्या ठिकाणी हजर झाले. त्यावेळी अकॅडमी चे मेजर व विद्यार्थी यांनी शेळी चोरी करणारे वरील चार इसम व दोन मोटरसायकल व चोरी केलेल्या दोन शेळ्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या.  शेळ्या चोरीच्या सर्व बाबीची पडताळणी करून फलटण पोलीस यांनी नातेपुते पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्याकडून वरील शेळ्या चोरीतील आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्यावर शेळ्या चोरीबाबत फलटण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. शेळ्या चोरी करणाऱ्या चोरांना यश अकॅडमी मेजर व पोलीस भरतीचा सराव करणारे विद्यार्थी यांनी पकडून दिल्याने फलटण पोलीस ठाणे व नातेपुते पोलीस ठाण्याच्या वतीने मेजर अनिल माने व यश करिअर अकॅडमीच्या
विद्यार्थ्यांचे आभार मानले.

चौकटीत :

मंगळवारी दिनांक २५ रोजी रात्री नेहमीप्रमाणे शेळ्या बांधून आमची कामे उरकून रात्री आम्ही झोपलो होतो बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी उठल्यानंतर दारात शेळ्या नसल्याने आम्ही भयभीत झालो या भागातील अनेक वेळा शेळ्या चोरीस गेल्या होत्या बुधवारी नातेपुते येथील शेळ्या मेंढ्यांचा मोठा आठवडी बाजार असतो म्हणून मी नातेपुते येथील शिखर शिंगणापूर चौकात जाऊन थांबलो असता फलटण कडून नातेपुते कडे चौघेजण दोन मोटरसायकल व त्यावर शेळ्या घेऊन घेऊन नातेपुते बाजारात शेळ्या विक्रीसाठी येत असल्याचे निदर्शनास आले मी माझ्या शेळ्या ओळखल्याने आरडाओरडा केली तेवढ्यात ते गाडी वळवून फलटण दिशेकडे वेगाने गाडी पळू लागले यश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना भरधाव वेगाने पळत जाऊन चौघांनाही पकडले आम्हाला आमच्या शेळ्या मिळाल्याने आमच्या जीवात जीव आला आमच्या शेळ्याची अंदाजे किंमत १७ हजार एवढी होते.

रोहित लोंडे ( सोनगांव )

चौकटीत :

नेहमीप्रमाणे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी अकॅडमीचे विद्यार्थी घेऊन मी त्यांचा सराव घेत होतो ५ किलोमीटर रस्त्यावर पाळण्याचा सराव घेत असताना शेळी मालक रोहित लोंढे चोर चोर पकडा पकडा असा आरडा ओरडा करत होते तेवढ्या वेळात विद्यार्थ्यांनी जोरात पळत जाऊन त्या चोरांना पकडले. उद्याचे होणारे भावी पोलीस अधिकारी यांनी चोरांना पकडून दिल्याने व शेतकरी रोहित लोंढे यांना त्या शेळ्या परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्याचा आनंद पाहून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळाला वर्दी घालून करणारे काम वर्दी घालायच्या अगोदरच आपण केले असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

मेजर अनिल माने 
( यश करिअर अकॅडमी नातेपुते )
Reactions

Post a Comment

0 Comments