अनगरच्या पाटील विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेच्या वाचनाने झाली.
संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अंकुश शिंदे यांनी भारतीय संविधानाची महत्त्वे व वैशिष्ट्ये स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी संविधान विषयक प्रश्नमंजुषा घेऊन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत ढोले होते. शालेय ग्रंथालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांचे विशेष प्रदर्शन भरवण्यात आले, ज्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मानवी साखळी करून संविधानाबद्दल घोषणा देण्यात आल्या.
यावेळी उपप्राचार्य महादेव चोपडे, परिवेक्षक माधव खरात, राजेंद्र डोके, परमेश्वर थिटे, राहुल नरके, बजरंग पाचपुंड, चंद्रकांत सरक, अमोल खताळ, विलास गुंड,तात्या गायकवाड सत्यवान कांबळे, पांडुरंग शिंदे, सत्यवान दाढे, दाजी गुंड, उज्वला घोलप, माधवी पाचपुंड, अनुपमा, वरवटकर, अनिता लांडगे, अनुराधा गोडसे, रंजना सरक यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. महादेव पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
.png)
0 Comments