Hot Posts

6/recent/ticker-posts

आत्मनिर्भर शेतकरी अभियान अंतर्गत 'स्वेरी'त दोन दिवसीय तंत्रज्ञान कार्यशाळा

 आत्मनिर्भर शेतकरी अभियान अंतर्गत 'स्वेरी'त दोन दिवसीय तंत्रज्ञान कार्यशाळा



पंढरपूर /(कटूसत्य वृत):-   

आत्मनिर्भर आणि बलशाली कृषीप्रधान भारताच्या निर्मितीसाठी तसेच शेतकऱ्यांना खते व औषधे निर्मितीत स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने 'आत्मनिर्भर शेतकरी अभियान' या उपक्रमांतर्गत गोपाळपूर

(ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये दोन दिवशीय विज्ञान संत अंकुश पाटील तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या निमित्ताने अनुभव कथन मेळावा आणि राज्यस्तरीय 'पोशिंदा' पुरस्कार सोहळा ही पार पडला.


या कार्यशाळेचे आयोजन विज्ञान संत अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान समिती महाराष्ट्र, जय जवान-जय किसान, वेंकटेश्वरा को-ऑप पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग सह. संस्था, नाशिक, मका आधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्प, इंदापूर, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर आणि पोलीस किसान, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या उपक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक स्वेरीचे युवा सचिव डॉ. सुरज रोंगे, वेंकटेश्वरा को-ऑप पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग सहकारी संस्था, नाशिकचे चेअरमन डॉ. शिवाजीराव डोळे, कार्यशाळा प्रशिक्षक विज्ञान संत अंकुश पाटील, राजेंद्र पाटील, श्रीपाद डांगे, ज्येष्ठ विश्वस्त धनंजय सालविठ्ठल आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात नानासाहेब कदम यांनी सांगितले की, रासायनिक खते, औषधे मुक्त स्वयंपूर्ण आत्मनिर्भर शेतकरी बनविण्यासाठी पोलीस किसान, पंढरपूरच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. कार्यशाळा प्रशिक्षक विज्ञान संत अंकुश पाटील (सांगली) यांनी कार्यशाळेत ऊस, सोयाबीन, मका, फळे व भाजीपाला यांसारख्या सर्व पिकांसाठी आवश्यक अमिनो अॅसिड, सिलिकॉन स्टिकर, लाईम सल्फर, ह्युमिक अॅसिड, फुल्विक अॅसिड, मायक्रो न्यूट्रिएंट्स, शेण-जिवामृत, निमकरंज तेल इत्यादी जैविक खते व औषधे घरच्या घरी तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्ष दिले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलीस किसान, पंढरपूरचे चेअरमन राजेंद्र पाटील, गणेश रत्नपारखी, बिरुदेव पारेकर, राजेंद्र डांगे, श्रीपाद डांगे, मांदे आणि प्रविण जाधव यांनी केले.


Reactions

Post a Comment

0 Comments