दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 8, 2025

दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष

 दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष




सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला शहर तसेच परिसरात अनेक वर्षे एकत्रितपणे कार्यरत राहिलेले ज्येष्ठ सहकारी, नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आगामी निवडणुकीसंदर्भात पुढील दिशा निश्चित करण्यात येईल, तसेच युती किंवा आघाडीबाबतचा निर्णयही या बैठकीतच ठरवला जाईल, असे प्रतिपादन माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले.

यावेळी झालेला विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार साळुंखे-पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत साळुंखे-पाटील यांना सुमारे पन्नास हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. निवडणुकीनंतर त्यांनी कोणत्याही पक्षाशी संलग्न न राहता काम सुरू ठेवले होते. सध्या ते भाजप किंवा इतर कोणत्या पक्षात जातात याकडे चर्चांना जाणारे आहे. गतनगरपालिका निवडणुकीत सांगोला शहरात सर्वाधिक नगरसेवक निवडून देत दिपकआबा साळुंखे यांच्या गटाने आपले बळ दाखवले होते. त्यामुळे या निवडणुकीत आबा कोणत्या पक्षासोबत किंवा गटासोबत आघाडी करतात, हे सांगोला नगरपरिषदेच्या राजकारणातील समीकरण ठरवणारे ठरणार आहे.

यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, 'गेली ३५ वर्षे राजकारणात कार्यरत असताना मी नेहमीच माझ्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. प्रत्येक निर्णयात त्यांचा सल्ला आणि विश्वास हा माझा आधार राहिला आहे. सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीतही प्रभागनिहाय इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊनच आपण पुढील दिशा ठरवू. कार्यकर्त्यांच्या मतांचा आणि भावनाांचा आदर राखूनच कोणत्या पक्षासोबत युती किंवा आघाडी करायची, हे ठरवले जाईल.'

नगरपालिका निवडणुकीचा ताप वाढत असताना दिपकआबा यांच्या चर्चांमुळे सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या गटाची भूमिका जाहीर होताच आगामी निवडणुकीचे राजकारण नव्या वळणावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages