महेश बिराजदार यांचा कुंभारीत सत्कार
कुंभारी,(कटूसत्य वृत):- भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी महेश बिराजदार तर भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी रामचंद्र होनराव यांची निवड झाल्याबद्दल कुंभारी येथील चावडी कट्टा प्रतिष्ठान व शिवशक्ती प्रतिष्ठान यांच्यावतीने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
माजी उपसभापती अप्पासाहेब बिराजदार, भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य सागर तेली आणि रमेश शबाशे यांच्या हस्ते तसेच शिवानंद आंदोडगी- पाटील व भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष महेश खसगे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना महेश बिराजदार म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते नशीबवान आहोत. आपल्याला मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आमदार सचिन कल्याणशेट्टी मिळाले आहेत. तसेच आपल्याला पक्षाचे मजबूत संघटन व काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांची सोबत लाभली आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते काशीनाथ बाराचारे, ग्रामपंचायत सदस्य गेनसिद्ध खांडेकर, प्रदीप बिराजदार, अप्पी छपेकर, समाधान चांगले, लक्ष्मण छपेकर, विश्वनाथ बिराजदार, मल्लिनाथ चांगले, श्रीकांत थोंटे, स्वप्निल छपेकर, युवराज माळी, चंद्रकांत हुलसुरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpeg)
0 Comments