विठ्ठल परिवार एकत्र येण्याचे संकेत
आमदार पाटील यांच्याबरोबर जाण्याची भालके यांची तयारी
पंढरपूर,(कटूसत्य वृत):- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता संपूर्ण विठ्ठल परिवाराने एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला मूर्त स्वरूप आले असून भगीरथ भालके यांनी येथे घेतलेल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचा आग्रह धरला. तर भालके यांनी देखील पत्रकारांशी बोलताना विठ्ठल परिवार एकसंध ठेवण्यासाठी पुढे येणार असल्याचे सांगितले.
नगपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी आपल्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
यानंतर पत्रकारांनी त्यांची संवाद साधला.
भालके यांनी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर, विधानसभेला जोडलेली तालुक्यातील २२ गावे व मोहोळ मतदारसंघास जोडलेली तालुक्यातील १७ गावे येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली असल्याचे सांगितले. स्व. भारत भालके यांनी शेवटपर्यंत विठ्ठल परिवार एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. आमची देखील हीच भूमिका आहे. यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी विठ्ठल परिवार एकत्र राहण्याची मागणी केली आहे. यानंतर माढा व सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या गावांची शनिवारी बैठक घेतली जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान,
विरोधकांनी आजपर्यंत विठ्ठल परिवारामध्ये फूट पाडून सत्ता मिळवली होती. यास स्व. भारत भालके यांनी चाप लावला होता. आता याच पध्दतीने आम्ही एकत्र यावे अशी सर्वांची इच्छा असून त्यानुसार सर्वांशी चर्चा सुरू असल्याचे भालके यांनी सांगितले. मात्र, मंगळवेढ्यात परिचारक यांच्यासह समविचारी आघाडी ही केवळ स्थानिक पदाधिकाऱ्यांचा निर्णय होता. तो विषय येथे नाही असे देखील उत्तर त्यांनी दिले.
चौकट
अभिजित पाटील काळेंच्या भेटीला दुपारी समर्थकांची बैठक झाल्यानंतर सायंकाळी आमदार अभिजित पाटील यांनी थेट सहकारशिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या पंढरपूर येथील कार्यालयास भेट दिली. यावेळी भालके यांच्यासह मनसेचे नेते दिलीप धोत्रे, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते महेश साठे, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक गणेश पाटील, संदीप पाटील, भारत कोळेकर आदी उपस्थित होते. या भेटीमुळे विठ्ठल परिवार एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याचे मानले जात आहे.
.jpeg)
0 Comments