Hot Posts

6/recent/ticker-posts

असीम सरोदे यांना मोठा दिलासा; बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून सनद रद्दीकरणावर स्थगिती

 असीम सरोदे यांना मोठा दिलासा; 

बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून सनद रद्दीकरणावर स्थगिती

नवी दिल्ली/मुंबई (वृत्तसेवा) – मानवाधिकार कार्यकर्ते आणि वरिष्ठ वकील असीम सरोदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सरोदे यांची सनद रद्द करण्याचा दिलेला आदेश बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगित केला आहे. पुढील सुनावणीची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या स्थगिती आदेशात म्हटले आहे, “सरोदे यांच्याविरोधातील प्रकरण हे प्रत्यक्षात व्यावसायिक गैरवर्तनाचेच आहे का, याची सखोल व स्वतंत्र चौकशी झाल्याशिवाय अंतिम निर्णय देणे योग्य ठरणार नाही.”

या निरीक्षणामुळे सरोदे यांच्या निलंबन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“मुळातच हा निर्णय अन्याय्य होता” समर्थकांचा आरोप

या कारवाईनंतर कायदेविषयक क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात मोठी प्रतिक्रिया उमटली होती.सरोदे यांच्या समर्थकांचे मत असे की, कारवाई ही पूर्वग्रहदूषित आणि अन्याय्य असून, त्यामागे वैयक्तिक व राजकीय दबाव काम करत असल्याची शंका होती.बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या स्थगितीमुळे हा अन्याय अधोरेखित झाल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

न्यायासाठी लढणाऱ्या ‘न्याययोद्ध्यांचे’ अभिनंदन

असीम सरोदे यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात अनेक वकिलांनी एकजूट दाखवत न्यायालयीन आणि सार्वजनिक पातळीवर आवाज उठवला होता.

स्थगिती आदेश आल्यानंतर कार्यकर्त्यांनी –

“लडेंगे! जितेंगे!!”

असा नारा देत आनंद व्यक्त केला.

पुढील सुनावणी निर्णायक ठरणार

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या हस्तक्षेपामुळे आता सर्वांचे लक्ष पुढील तारखेकडे लागले आहे. ही सुनावणी सरोदे यांच्या वकीली कारकिर्दीवरील काळे मेघ दूर करते का, याकडे कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागून राहणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments