जन्नतुल फिरदोस कब्रस्तान सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन मोठ्या थाटात संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मध्ये ‘जन्नतुल फिरदोस कब्रस्तान सांस्कृतिक भवन’ उभारणीच्या कामाचे भूमिपूजन दिमाखात पार पडले. हा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्यांक विभाग निरीक्षक, ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते तसेच कोकण बँकेचे संचालक नजीब भाई मुल्ला यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाला. या प्रसंगी शहर काजी जनाब अमजद सय्यद साहब, अब्दुल राफे (अहेल हदिस), मौलाना इब्राहिम कासमी सदर, शहा इकबाल हुसेन दुर्वेश, हाजी मकबूल मोहोळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जन्नतुल फिरदोस मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष पैगंबर इमाम शेख, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, रियाज खैरादी, माजी नगरसेविका नूतन प्रमोद गायकवाड, प्रदेश सचिव इरफान शेख, अल्पसंख्यांक आयोग सदस्य वसीम बुराण, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, फारुख मटके, रियाज शेख, सायरा शेख, शिपन शेख, युसुफ पठाण, जमीर मुल्ला, शहाजान शेख, जाकीर कवठेकर, सिकंदर शेख, कोशन कुरेशी, फारूक बागवान, अहमद कासिम आळगी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर, धार्मिक नेते व समाजसेवक उपस्थित होते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांचा निधी नगरसेवक व प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे. प्रास्ताविक करताना किसन जाधव म्हणाले, सोलापूर महानगरपालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव भासत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अल्पसंख्यांक, मोची, गवळी, मराठा, लिंगायत अशा सर्व समाजांसाठी सांस्कृतिक भवन उभारणीची कामे सुरू असून ती लवकरच पूर्ण होतील. पुढील काळात आणखी निधी मिळवून प्रभागाचा दर्जेदार विकास साधणार आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना इब्राहिम कासमी म्हणाले की किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या कार्याने मुस्लिम समाजात एकतेची ज्योत पेटले आहे. मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या जाधव आणि गायकवाड यांचे कार्य कौतुस्कास्पद असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नजीब मुल्ला म्हणाले,किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे जातीभेदाच्या पलीकडे सर्वसमावेशक विकासाचे उत्तम उदाहरण आहेत. सर्व समाजांना एकत्र आणून विकासाची दिशा देणे हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कब्रस्तानाचा वॉल, कंपाऊंड, रस्ता तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार किसन जाधव, नागेश गायकवाड आणि युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. मोठ्या थाटात संपन्न झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जाधव - गायकवाड यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक २२ मध्ये सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक प्रगती आणि सर्वसमावेशक विकासाची वाट अधिक बळकट होणार आहे.

0 Comments