Hot Posts

6/recent/ticker-posts

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार सोलापूर दौऱ्यावर

 मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार सोलापूर दौऱ्यावर





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी गुरुवारी (दि. ६) सोलापूर विभागातील टिकेरवाडी येथे सुरू असलेल्या नव्या कोच टर्मिनल प्रकल्पाची पाहणी करून कामांना वेग देण्याचे निर्देश दिले.

वाडी ते सोलापूर या संपूर्ण सेक्शनचा आढावा घेताना त्यांनी पायाभूत सुविधा आणि प्रवासी सेवांच्या सुधारणांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

दौऱ्याची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता वाढी स्टेशनपासून झाली. महाव्यवस्थापकांनी सर्वप्रथम वाडी आणि हिरेनंदूर स्टेशनवरील साईडिंग व एस्ट्रा लाईन टाकण्याच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गुलबर्गा स्टेशनवर थांबून वाहतूक व्यवस्थापन, रेत्वे सुविधांमधील सुधारणा आणि स्टेशन परिसरातील कामांचा आढावा घेतला.

यानंतर त्यांनी टिकेरवाडी येथे प्रस्तावित कोच टर्मिनलचे स्थळ प्रत्यक्ष पाहिले. या टर्मिनलमुळे सोलापूर विभागात गाड्यांच्या तांत्रिक देखभालीची क्षमता वाढणार असून, स्थानिक स्तरावर नवीन गाड्यांच्या प्रारंभाला आणि प्रवासी सुविधांच्या विस्ताराला मोठी चालना मिळेल. महाव्यवस्थापकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामांच्या गतीत वाढ करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

तसेच त्यांनी प्रकल्पातील सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि कामाच्या गुणवतेवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. सायंकाळी पाच वाजता विजय कुमार सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यांनी स्थानक परिसर, प्लॅटफॉर्म, प्रवासी सुविधा आणि सुरू असलेल्या नूतनीकरण कामांची पाहणी केली. स्वच्छता, डिस्प्ले सिस्टम आणि प्रवासी प्रवाह व्यवस्थापनात अधिक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

या दौऱ्यात सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजीत मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments