Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थानिक आघाडी नाही, प्रसंगी तुतारीच्या चिन्हावर लढू- खा मोहिते पाटील

 स्थानिक आघाडी नाही, प्रसंगी तुतारीच्या चिन्हावर लढू- खा मोहिते पाटील 





मोहोळ (कटूसत्य वृत्त):- पक्षश्रेष्ठींनी मला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात काम करण्याच्या सूक्स दिल्या आहेत. म्हणून मी इथे आली आहे.

येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका माविकास आघाड़ी म्हणून आम्ही जिल्ह्यात कुठेही स्थानिक पातळीवर आघाडी करून निवडणूक लढविणार नाही. स्थानिक आघाडी करून लोक निवडून येतात आणि पुन्हा इकडे तिकडे उड्या मारतात. प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गट स्वतंत्र लढेल. आमचा एकही पदाधिकारी निवडणून नाही आला तरी चालेल परंतु सर्व जागा तुतारी या चिन्हावर लढविल्या जातील, असं परखड मत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.

मोहोळ येथील अजिंक्यतारा हॉटेल येथे होऊ घातलेल्या नगरपालिका जिल्ला परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विनयकुमार पाटील व मोहोळ विधानसभा अध्यक्ष रणजित चवरे यांनी संवाद बैठकीचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, मोहोळचे नेते संजय क्षीरसागर, रणजित चवरे, अ‍ॅड पवन गायकवाड, बालास्तव पाटील, मनसेचे तालुका अध्यक्ष कैलास खडके, अशोक देशमुख सुवर्णा शिवपुरे, अस्ण तोडकर, विनंती कुलकर्णी, चंद्रकांत इंगळे, बंदनवाज कोरबू, विलास पाटील, सतीश पाटील, बाळासाहेब बायोमोडे, अ‍ॅड. विठोबा पुजारी, भास्कर खटके आदी उपस्थित होते.

खासदार मोहिते-पाटील म्हणाले, मी खासदार झाल्यापासून माझ्या माढा मतदारसंघात काम करीत होतो. मी कधी ही कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ केली नाही. तरीही जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या अडचणी मी सोडावीत होतो. आमचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशाने आम्ही या निवडणुकीत नवयुवकांना संधी देणार आहोत. एक पुरोगामी विचारांची चळवळ सुरू ठेवणार आहोत, असे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले.

नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे

माजी आमदार रमेश कदम म्हणाले, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत कार्यकर्ता हा नेत्याच्या पाठीमागे उभा असतो. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत. या निवडणुकीतूनच कार्यकर्ता नेता होत असतो. अशावेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आमदारकी मलाच, खासदारकी मलाच, नगरसेवक ही मीच असे चालणार नाही. कार्यकत्यांनी काय केवळ सतरंज्या उचलायच्या का ? असा संदेश जनमानसात व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये जाईल.

आता नेत्यांच्या घरात उमेदवारी नको – रमेश कदम

मोहोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या ठिकाणी खऱ्या मागासवर्गीय महिलेलाच संधी मिळाली पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मुलीला, पत्नीला, बहिणीला अथवा नेत्याच्या घरात ही उमेदवारी दिली जाऊ नये, अशी भूमिका माजी आमदार कदम यांनी मांडली. 
आमदारांवर माजी आमदारांनी डागली तोफ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली, त्यांच्या अनुपस्थितीमुळे उपस्थित नेत्यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली. मोहोळ विधानसभा मतदारसंघात अस्तित्व नसणाऱ्या व कुठलीही पात्रता नसणारा माणून केवळ शरद पवार यांच्या नावावर, त्यांच्या विचारांवर निवडून आला. मात्र आज ते काय करतोय, हे सर्वश्रुत आहे, असा हल्लाबोल माजी आमदार रमेश कदम यांनी केला.

Reactions

Post a Comment

0 Comments