Hot Posts

6/recent/ticker-posts

राजन पाटील समर्थकांचा थेट अजितदादांवरच हल्ला; 'हे तर सुडबुद्धीचे राजकारण....'

 राजन पाटील समर्थकांचा थेट अजितदादांवरच हल्ला;

 'हे तर  सुडबुद्धीचे राजकारण....'

मोहोळ  (कटूसत्य वृत्त):-अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी उज्वला थिटे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळे राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड होऊ शकलेली नाही, त्यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी आपला राग अजित पवारांवर काढला आहे. बिनविरोधची परंपरा खंडीत केलेली आहे. राजन पाटील हे भाजपमध्ये गेल्यानंतर राज्यात केवळ अनगरची नगरपंचायत बिनविरोध होते की काय, अशी भीती अजित पवारांना (Ajit Pawar) वाटायला लागली. त्यांनी कटकारस्थान करून अनगरमधील बिनविरोधची परंपरा खंडीत केली आहे, असा आरोप भाऊराव गणपत इंगळे यांनी केला.

अनगर मध्ये दहशत असती तर एवढे लोक राजन पाटील (Rajan Patil यांच्यासाठी एकत्र आले असते का, असा सवाल एका ज्येष्ठ नागरिकाने केला. दरम्यान, भाजपची नगरपंचायत बिनविरोध होऊ नये, यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे निवडणूक लावली आहे, असे एका समर्थकाने सांगितले.

अनगर नगरपंचायतीची निवडणूक सुडबुद्धीतून लावण्यात आलेली आहे. उज्वला थिटे उमेदवारी अर्ज भरायला आल्या होत्या, त्यामागे कोणी समर्थक तुम्हाला दिसले का. त्यामुळे थिटे यांच्या पाठीशी किती लोक आहेत, हे सर्वांच्या लक्षात आलेच असेल. हा सूडबुद्धीने अजितदादांनी केलेला खेळ आहे, असा आरोप एका समर्थकाने केला आहे.

अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी गावातील सर्व ग्रामस्थांची इच्छा होती. मात्र, गाझी नगरपरिषद बिनविरोध होत नाही. पण राजन पाटलांची नगरपंचायत बिनविरोध होते, हे सूडबुद्धीचे राजकारण अजित पवारांकडून केले गेले आहे. अनगर गाव बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. माजी आमदार बाबूराव पाटील यांच्यापासून सुरू असलेली बिनविरोधची परंपरा मोडीत काढायची आणि अनगरला बदनाम कसं करायचं, एवढंच कारस्थान अजित पवार यांनी केलेले आहे, असा दावा पाटील समर्थकाने केलेला आहे.

बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी अवस्था झाली, त्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. पण त्यांनी अनगर नगरपंचायत निवडणुकीकडे लक्ष दिलेले आहे. अजित पवारांच्या अनगरमध्ये बिहारपेक्षा बिकट परिस्थिती होईल. उज्वला थिटे यांना पाचपेक्षा जास्त मतं पडणार नाहीत.

भाजपचा नगराध्यक्ष बिनविरोध होऊ द्यायचा नव्हता. भाजपचा विजयी अनगरमधून सुरु होणार होता, तो त्यांना होऊ द्यायचा नव्हता. त्यांनी पहाटेची पंरपरा चालू ठेवलेली आहे. भाजपची नगरपंचायत बिनविरोध होऊ द्यायची नाही, यासाठी त्यांनी अट्टाहास केला आहे, असा आरोप राजन पाटील समर्थकांनी अजित पवारांवर केला.

Reactions

Post a Comment

0 Comments