अक्षरसंस्कार गुरुकुल देवडी येथे बालदिन निमित्त भरगच्च कार्यक्रम
देवडी (कटूसत्य वृत्त):- आपल्या नवनवीन उपक्रमांनी पंचक्रोशीत प्रसिद्ध अक्षरसंस्कार गुरुकुल मध्ये 14 नोव्हेंबर चाचा नेहरू जयंती आणि अध्याक्षा सौ सई नितीन डोंगरे यांच्या वाढ दिवसाच्या निमित्त बालसभा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, बाझार डे, पालक सभा आणि ओपन हाउस चे आयोजन करण्यात आले.
चाचा नेहरू यांच्या प्रतिमा पूजनाने पालकांच्या उदंड प्रतिसादात सभेला सुरुवात झाली. चि अक्षर डोंगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अध्यक्षा सौ सई मॅडम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. श्रीमती केशर डोंगरे यांच्या हस्ते गुरुकुल परिवारारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. वाढदिवसा निमित्त सई मॅडम यांनी शाळेला 12 पुस्तकाची भेट दिली आणि मुलांनी अवांतर वाचन करावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमासाठी डॉ. समाधान थोरात प्रमुख पाहुणे लाभले त्यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या प्रगतीची प्रशंसा केली आणि त्यांच्या मुलांचा पाया याच शाळेमध्ये पक्का झाला हे सर्वांना सांगितले. इयत्ता सहावीच्या मुलांनी सभेचे आयोजन केले. बाझार डे मधून 35 हजार रुपयांची उलाढाल झाली. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. निकिता डोंगरे मॅडम, कु. प्रगती गोफणे, सौ स्वप्नाली वाखरकर, सौ शुभांगी भोसले, सौ महानंदा मुळे, अक्षय गायकवाड, कु. प्रज्ञा नामदे, कु. रत्नश्री भांगे, सौ प्राजक्ता भांगे, सौ रेणुका नागटिळक, मनोज जाधव, प्रदीप वसेकर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. नितीन डोंगरे, प्रशांत भोसले, योगेश देशमुख आणि डॉ. अमोल जाधव यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

0 Comments