Hot Posts

6/recent/ticker-posts

कुंभारी येथे अभिष्टचिंतन व भाजपा पक्षप्रवेश सोहळा संपन्न

 कुंभारी येथे अभिष्टचिंतन व भाजपा पक्षप्रवेश सोहळा संपन्न




 कुंभारी, (कटूसत्य वृत्त):- आपल्या अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील कुंभारी येथील काँग्रेसचे नेते कुंभारी अप्पासाहेब बिराजदार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर आणि विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून जाहीर पक्षप्रवेश केला. यासोबतच त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच अनेक मान्यवरांनी अप्पासाहेबांचे अभिष्टचिंतन केले. तसेच, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात कुंभारी येथील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. यावेळी सोहळ्यात पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना संघटन बळकट करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. तसेच, गावाच्या आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना यानिमित्ताने अधिक मजबूत झाली.

यावेळी शशिकांत चव्हाण, विकास वाघमारे, महेश बिराजदार, रामचंद्र होनराव, अण्णप्पा बाराचारे, शिरीष पाटील, आनंद तानवडे, बिपीन करजोळे, गेनसिद्ध गुंडे, इरेश कटारे, कुमारी श्रुतीताई निकंबे, राजशेखर कोरे, सागर तेली, बाळासाहेब कुलकर्णी, अप्पू थोंटे, धिरज छपेकर, श्रीशैल माळी, विरपाक्ष घेरडे, शब्बीर जमादार,  प्रकाश करपे, वैभव हलसगे, सूरज पाटील, सचिन सुतार, महेश खसगे, सौदागर पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments