सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिवाळीपूर्वी आर्द्रा मॉल या दालनाचे प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सनी लियोनी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते. अवघ्या एक ते दीड महिन्यामध्ये आर्द्रा मॉल ने सोलापूर मध्ये नावलौकिक मिळवला असल्याचे गौरव उद्गार प्रसिद्ध टेक्स्टाईल उद्योजक अमित जैन यांनी काढले आहेत.
सम्राट चौक नॅशनल हायवे ब्रिजच्या पलीकडे असलेल्या आर्द्रा मॉल येथे लकी ड्रॉ विनर च्या प्रसंगी उद्योजक जैन हे बोलत होते.यावेळी संतोष भुतडा, जोड भावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलानी, आर्द्रा मॉलचे विजय अय्यर संतोष भुतडा, शुभम भुतडा, आणि कार विजेते संदीप भोजने हे उपस्थित होते.
सोलापूरसह लातूर, धाराशिव जिल्ह्यातील ग्राहकांच्या खास पसंतीला उतरलेल्या आर्द्रा मॉलमध्ये दिवाळीच्या सुरुवातीला व १५ अन् १६ नोव्हेंबर रोजी खरेदी केलेल्या वीस हजार ग्राहकासाठी लकी ड्रॉ काढण्यात आले होते. या लकी ड्रॉ मध्ये एका कारसह अडीच हजार बक्षीसांची अतिवृष्टी आद्रा मॉलच्या वतीने ग्राहकांवरती करण्यात आली. कुमट्याचे संदीप भोजने हे फोर व्हीलर ( कार ) चे मानकरी ठरले आहेत.
1200 रुपयांच्या खरेदीवर केवळ एक रुपया जादा देऊन शर्ट किंवा साडी किंवा कुर्ती घेता येईल अशी स्कीम राबविण्यात आली होती. त्याला सोलापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला असल्याचे संचालक विजय अय्यर यांनी सांगितले.
रोजचे कपडे तसेच लग्नाचा बस्ता खरेदीसाठी व सर्व प्रकारच्या ग्राहकां च्या पसंतीला आद्रा मॉल उतरले आहे. सोलापूर,धाराशिव धाराशिव ,नांदेड येथून ग्राहकांनी कपडे खरेदीसाठी प्रचंड प्रतिसाद दिला असून आपले कुपन घेऊन बक्षिसाची खात्री करण्यासाठी एक वेळ मला अवश्य भेट द्यावे असे आवाहन आद्रा मॉलचे संचालक शुभम भुतडा यांनी केले आहे.
ही होती बक्षिसे...l
बिन बॅग ४००, सुटकेस ३००, पॅन सेट ३००, लगेज बॅग२००, हेडफोन १६०, ब्लूटूथ स्पीकर १०० ,ड्रेसिंग टेबल १०, टी पॉय १० ,तिकीट ४५०, बुक रॅक १०, कपडे ठेवायचे कपाट १०, सोपासेट ९, टीव्ही ९, मॅट्रेस ७, बेड ६, वाशिंग मशीन ५ फ्रिज ४,एसी ३,मोटरसायकल २ आणि एक (कार )फोर व्हीलर अशा बक्षीसांचा समावेश आहे.
.png)
0 Comments