हत्तूर येथे शुक्रवारी सिद्धारूढ स्वामीजींचे प्रवचन
हत्तूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे सन्मुखारूढ मठ, विजयपूर व शांताश्रम हुबळी मठाचे परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु श्री अभिनव सिद्धारूढ स्वामी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.सालाबादाप्रमाणे यंदाही अध्यात्मिक सुविचार संध्या अंतर्गत शुक्रवार दि.२१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता हत्तूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात प्रवचनआयोजित करण्यात आली आहे.यावेळी बरुरचे आनंद शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी गुरु दर्शन व प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन हत्तूर सदभक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments