बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक.. उद्धव ठाकरेंची नियुक्ती, पडद्यामागची डावपेच Inside स्टोरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 18, 2025

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक.. उद्धव ठाकरेंची नियुक्ती, पडद्यामागची डावपेच Inside स्टोरी

 बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक.. उद्धव ठाकरेंची नियुक्ती, 

 पडद्यामागची डावपेच  Inside स्टोरी 


 
                                             

मुंबई(कटूसत्य वृत्त):- शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या (17 नोव्हेंबर) अवघ्या दोन दिवस आधी महायुती सरकारने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. ज्याचं अध्यक्ष पद हे उद्धव ठाकरेंना देण्यात आलं. तर यासोबत इतर सदस्यांची देखील नियुक्ती करण्यात आली. पण या सगळ्या नियुक्त्यांआधी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. त्याचीच inside स्टोरी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

त्याचं झालं असं की, गेल्या अनेक वर्षापासून स्मारकाच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर 15 नोव्हेंबर 2025 रोजी या नियुक्त्यांवर एकमत झाले असून, ठाकरे कुटुंबीयांचेच वर्चस्व तिथे कायम राहिले आहे.

शुक्रवारी (15 नोव्हेंबर) जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार  

अध्यक्ष : उद्धव बाळासाहेब ठाकरे (पाच वर्षांसाठी)  

सचिव : सुभाष देसाई  

सदस्य : आदित्य ठाकरे (पाच वर्षांसाठी)

याशिवाय महायुतीतील घटक पक्षांच्या दबावाखाली भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून प्रत्येकी एका आमदाराचा समावेश करावा अशी सरकारची सुरुवातीची इच्छा होती. मात्र ठाकरे गटाने याला तीव्र विरोध केल्याने नियुक्त्या रखडल्या होत्या.                                         

शिवसेना पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदाराला बाळासाहेबांच्या स्मारक न्यासावर स्थान देण्यास उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिला होता. “बाळासाहेबांचे खरे वारसदार आम्ही आहोत, पक्ष फोडणाऱ्यांना स्मारकावर जागा कशी काय?” अशी ठाकरे गटाची ठाम भूमिका होती. यामुळे गेल्या दिवसांपासून या सगळ्या नियुक्त्या रखडल्या होत्या.

अखेर एकनाथ शिंदे यांनी माघार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दीर्घकाळ काम केलेले आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार शिशिर शिंदे यांचे नाव पुढे केले. शिशिर शिंदे हे आता जरी शिंदेंच्या शिवसेनेत असले तरी पक्ष फुटीनंतर ते एकनाथ शिंदे गटात गेले नव्हते, ही बाब उद्धव ठाकरेंनाही मान्य होती. यावर एकमत करण्यासाठी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी निरोप देण्यात आला. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही सांमजस्याची भूमिका घेण्यात आली. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी शिशिर शिंदेंच्या नावाला सहमती दर्शविली.                    

 दुसरीकडे भाजपने ठाण्याचे आमदार पराग आळवणी यांचेही नाव सुचवले होते. त्यावरही बराच खल झाला. पण चर्चेअंती त्यांच्या नावाला देखील हिरवा कंदील दाखविण्यात आला.

दोन्ही नावे ठाकरे गटाला मान्य झाल्यानंतर आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंशी समन्वय साधला आणि अखेर सर्वांचे एकमत झाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला आपल्या गटातील कोणत्याही आमदाराचा समावेश करण्यावर आग्रह धरला होता. मात्र सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी “बाळासाहेबांच्या स्मारकावरून नव्याने राजकारण तापू नये” अशी भूमिका घेतल्याने शिंदे यांनी माघार घेतली आणि शिशिर शिंदे यांचे नाव पुढे करून सामंजस्य दाखवले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages