दुष्कर्म प्रकरणी युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर- ॲड रितेश थोबडे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी दिगंबर कुमार शिवपालक वय 24 राहणार मौजे. उंबर पागे तालुका पंढरपूर येथील युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की दिनांक 9. 11. 2024 रोजी रात्री दहा वाजाचे सुमारास पीडिता हि तिचे आई वडिलांसोबत जेवण करून घरात झोपली होती. पहाटे 4 वाजाचे सुमारास पीडितेच्या आईस जाग आली त्यावेळी पीडिता हि घरात दिसून आली नाही. त्यावर पिडीतेच्या आईने कोणीतरी अज्ञात कारणावरून पिडीतेला फूस लावून पळून नेले आहे अशी फिर्याद करकंब पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास केला असता दिगंबरने पिडीतेस आत्महत्या करण्याची भिती दाखवून आई-वडिलांच्या रखवालीतून तीस घराच्या बाहेर काढून तीस मोटर सायकल वर बसून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिचे वर दुष्कर्म केले असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यावरून दिगंबर यास पोलिसांनी अटक अटक केली होती.
आपणास जामीन मिळवा म्हणून दिगंबरने पंढरपूर येथील सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर दिगंबरने कोल्हापूर उच्च न्यायालयात ॲड रितेश थोबडे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात गुन्ह्याचा तपास हा पूर्ण झाला असून अर्जदार /आरोपीस कोठडीत ठेवल्याने कोणतीही फलनिष्पत्ती होणार नाही असा युक्तिवाद मांडला तो ग्राह्य धरून न्यायालयाने 20,000 रुपयांच्या जातमुचुलक्यावर जामीन मंजूर केला.
यात अर्जदार आरोपीतर्फ ॲड रितेश थोबडे तर सरकार तर्फे ॲड विजयालक्ष्मी कामात यांनी काम पाहिले.

0 Comments