भ्रष्टाचारी शोधून भाजपात, आता बांग्लादेशी शोध मोहीम सुरू!" – किरीट सोमय्यांवर विरोधकांचा घणाघात
विरोधकांनी सोमय्यांवर आरोप केला आहे की, “ज्यांना किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचारी म्हटलं, त्यांना भाजपनं आपल्या पक्षात घेतलं. आता ते बांग्लादेशी शोधत आहेत, म्हणजे हेही सगळे भाजपात घेणार काय?” असा खोचक सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.
भ्रष्टाचारविरोधी मोहिमेपासून सुरू झालेला सोमय्यांचा प्रवास आता ‘घुसखोरीविरोधी’ वळणावर पोहोचला असला तरी, त्यांच्याच भूमिकांतील विसंगतीवर विरोधकांनी बोट ठेवलं आहे. “सोमय्यांच्या तोंडात सध्या भाजपची भाषा आहे. ज्यांना ते आधी ‘चोर’ म्हणायचे, तेच आज त्यांच्या शेजारी बसलेत,” अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे.
सोलापूर, पुणे, मुंबईसह राज्यभरात सोमय्यांनी केलेल्या आंदोलनांनंतर अनेक वेळा त्यांनी काही नेत्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पण त्यापैकी अनेक जण नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यावरील आरोप धुळीस मिळाले. आता “बांग्लादेशी शोध मोहीम” सुरू करताना पुन्हा तोच इतिहास घडतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय असा की – “भ्रष्टाचारी शोधून भाजपात घेतले, आता बांग्लादेशी शोधूनही भाजपात घेणार काय?” विरोधकांचं म्हणणं आहे, “किरिट सोमय्या जर खरंच देशप्रेमी असतील, तर त्यांनी पक्षातील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करावं. बांग्लादेशी नव्हे, आधी आपल्या शेजारी बसलेल्यांकडे पाहावं.”राज्याच्या राजकारणात या टोलेबाजीमुळे पुन्हा एकदा तापमान वाढलं आहे.
0 Comments