Hot Posts

6/recent/ticker-posts

शाहीन शेखची हकालपट्टी करा - अंजली वस्त्रे

 शाहीन शेखची हकालपट्टी करा - अंजली वस्त्रे 

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :– मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षात गटबाजी उघडकीस आली आहे. महिला काँग्रेस शहराध्यक्ष अंजली वस्त्रे यांनी शाहीन शेख यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

वस्त्रे म्हणाल्या, “मागील नगरपरिषद निवडणुकीतही शाहीन शेख यांनी ‘डील’ करून स्वतःची उमेदवारी मिळवली आणि पक्षाचे प्रचंड नुकसान केले. आता पुन्हा तेच प्रकार उघडपणे घडत आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, “पक्षासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या, आदेश पाळणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आयुष्याशी खेळ करणारे नेते पक्षाशी सरळ गद्दारी करतात. अशा नेत्यांवर कारवाई न झाल्यास पक्षात शिस्त राहणार नाही.”

अंजली वस्त्रे यांनी या नेत्यावर कठोर कारवाई करून काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments