Hot Posts

6/recent/ticker-posts

DPDC निधी समसमान पद्धतीने वाटप करण्याची खा. प्रणिती शिंदे यांची मागणी

 DPDC निधी समसमान पद्धतीने वाटप करण्याची खा. प्रणिती शिंदे यांची मागणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळासोबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन DPDC (जिल्हा नियोजन समिती) निधीचे वाटप सर्व लोकप्रतिनिधींना समसमान आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे अशी मागणी केली.

खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “DPDC निधीमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा पक्षीय भेदभाव होऊ नये. मागील NCAP निधीच्या वाटपात तफावत दिसून आली होती, ज्यात विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जाणूनबुजून डावलल्याचे स्पष्टपणे दिसते. अशीच परिस्थिती DPDC मध्ये होऊ नये. निधी न देणे हे आमच्यावर नव्हे तर जनतेवर अन्याय आहे. आपण सर्व लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील लोकांच्या विकासासाठी निधी मागतो. जर निधी वाटपात पक्षीय भेदभाव झाला तर सोलापूरच्या जनतेवर अन्याय ठरेल. त्यामुळे पालकमंत्र्यांनी ही बाब संवेदनशीलतेने घेऊन महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावर समसमान निधी वाटप व्हावे,” अशी मागणी त्यांनी केली.

याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, “DPDC निधी वाटप करताना कुठलाही पक्षीय दूजाभाव होणार नाही. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाही योग्य त्या प्रमाणात निधी दिला जाईल. DPDC निधीचे वितरण प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे,” अशी ग्वाही त्यांनी खासदार प्रणिती शिंदे व शिष्टमंडळाला दिली.

या प्रसंगी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, अलकाताई राठोड, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, परवीन इनामदार, अनुराधा काटकर, मनोज यलगुलवार, हणमंतू सायबोलू, सुशील बंदपट्टे, गणेश डोंगरे, प्रमिला तुपलवंडे, जुबेर कुरेशी, वाहिद बिजापूरे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, देवाभाऊ गायकवाड, युवराज जाधव, नागनाथ कदम, बाबुराव म्हेत्रे, उदय चाकोते, अब्दुल खलीक मुल्ला, रुपेश गायकवाड, अनिल जाधव, विवेक कन्ना, रफिक इनामदार, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, रेखा बिनेकर, मल्लेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments