Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी अकलाई मंदिर परिसराची साफसफाई केली

 विद्यार्थ्यांनी अकलाई मंदिर परिसराची साफसफाई केली




अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या डी.फार्मसी च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी अकलूज गावचे ग्रामदैवत अकलाई देवी मंदिर परिसराची साफसफाई केली.हॆ स्वछता अभियान  राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत घेण्यात आले होते.विद्यार्थींनी मंदिर परिसराची स्वछता करून नीरा नदीच्या काठावरील स्वछता करण्यात आली.
                या दरम्यान विद्यार्थ्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्व समजून सांगण्यात आले व आपण आपला परिसर स्वतःच स्वच्छ ठेवावा याबाबत मार्गदर्शन केले.स्वछता करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची देखील काळजी महाविद्यालयच्या अध्यापकांकडून घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी "स्वच्छ भारत,स्वस्थ भारत"अश्या घोषणा देऊन स्वच्छता अभियानाची सांगता झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments