रस्ते व पुलांच्या दुरावस्थेबाबत राज्यमंत्री बोर्डीकर यांची खा.पाटील यांनी भेट घेतली
अकलूज (कटूसत्य वृत्त):-
माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस,माण, पंढरपूर, माढा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अंतर्गत येणाऱ्या रस्ते व पुलांच्या खराब स्थितीबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सार्वजनिक उपक्रम) मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांची भेट घेतली.
भेटीदरम्यान खासदार मोहिते पाटील यांनी मतदारसंघातील अनेक प्रमुख रस्त्यांवर आणि पुलांवर अपूर्ण प्रकल्प, दुरुस्तीची कमतरता याबाबत सविस्तर माहिती राज्यमंत्र्यांसमोर मांडली. त्यांनी सांगितले की, या दुरावस्थेमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, अपघातांची शक्यता वाढते आणि प्रवासात अनेक अडचणी येतात.
0 Comments