Hot Posts

6/recent/ticker-posts

गुरसाळे येथील शौर्य पवार स्विमिंगमध्ये राज्यात दुसरा

                  गुरसाळे येथील शौर्य पवार स्विमिंगमध्ये राज्यात दुसरा 

    


                            


नातेपुते (कटूसत्य वृत्त):- १७ वी राज्यस्तरीय पेरा स्विमिंग चॅम्पियनशिप छत्रपती संभाजीनगर येथे ५ ऑक्टोबर  रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील गुरसाळे येथील शौर्य रूपाली सतीश पवार यांनी पन्नास मीटर फ्रीस्टाइल गटात राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांच्या सन्मानार्थ छत्रपती संभाजीनगरच्या महापौरांनी त्यांना मेडल प्रदान करून गौरव केले. गुरसाळे गाव व आसपासच्या परिसरातून शौर्यासाठी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शौर्यच्या आत्मविश्वासामध्ये "आर्ट ऑफ लिव्हिंग" यांच्या वाय एल टी पी कोर्समुळे मोठा वाढ झाल्याचे त्याच्या आई, रुपाली पवार व वडील, सतीश पवार यांनी नमूद केले. या दृष्टीने त्याला या कोर्सचा मोठा फायदा झाला आहे. त्याचा राष्ट्रीय पातळीवरही निवड झाल्याचे आनंदाचे वृत्त आहे.शौर्यला स्विमिंगमध्ये प्रशिक्षित करण्यासाठी  बर्गे सर, तावरे सर, पुरी सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्कृती मोरे, मुख्य कार्यकारी क्रीडा अधिकारी, सातारा आणि स्वप्नील पाटील, मुख्य कार्यकारी क्रीडा अधिकारी, बालेवाडी पुणे यांनी देखील त्याला हातभार दिला.शौर्यच्या या यशाने तेवढ्या नव्हे तर संपूर्ण गावाचा मान वाढविला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments