Hot Posts

6/recent/ticker-posts

दिवाळी निमित्त विशेष गाड्यांच्या १८ फेऱ्या सुरू होणार

 दिवाळी निमित्त विशेष गाड्यांच्या १८ फेऱ्या सुरू होणार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिवाळी सणानिमित्त २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एसएमव्हीटी बेंगळुरू आणि बीदर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या सेवा १८ फेऱ्यांसाठी रेल्वे सुरू ठेवणार आहे, त्यानुसार खाली दिलेल्या तपशीलांमध्ये माहिती दिली आहे:

एसएमव्हीटी बेंगळुरू-बीदर द्वि-साप्ताहिक विशेष (१८ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक ०६५३९ एसएमव्हीटी बेंगळुरू-बीदर द्वि-साप्ताहिक विशेष २८.०९.२०२५ पर्यंत चालवण्याची सूचना देण्यात आली होती. ती आता ३१.१०.२०२५ पर्यंत दर शुक्रवार आणि रविवारी चालवली जाईल. (९ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०६५४० बीदर-एसएमव्हीटी बेंगळुरू द्वि-साप्ताहिक विशेष २९.०९.२०२५ पर्यंत चालवण्याची सूचना देण्यात आली होती. ती आता ०१.११.२०२५ पर्यंत दर शनिवार आणि सोमवार चालवली जाईल. (९ फेऱ्या)
वरील गाड्यांच्या रचनेत कोणताही बदल होणार नाही.

या विशेष गाड्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कलबुरगि, शहाबाद आणि वाडी या ३ स्थानकांवर थांबतील.

आरक्षण आणि बुकिंग:

विशेष शुल्कावरील विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर उघडेल.

अनारक्षित डब्यांचे बुकिंग स्थानकांवर बुकिंग काउंटर आणि यूटीएस अॅपद्वारे देखील करता येते. प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांसह प्रवास करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments