Hot Posts

6/recent/ticker-posts

ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं संपर्कमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

 ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं संपर्कमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांचा सन्मान




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ मिळावे या उद्देशाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. सोलापूर शहर जिल्हा संपर्कमंत्री म्हणून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबाबदारी सोपवली. सोलापूर सह धाराशिव, वाशिम आणि जालना या जिल्ह्याचे देखील संपर्कमंत्री म्हणून त्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान नूतन संपर्क मंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी सोलापूर शहरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता सोलापूर विमानतळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं सोलापूरच्या मानाचा आजोबा गणपतीची प्रतिमा शाल पांघरून त्यांच्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा देत त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार,माजी नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेवक गणेश पुजारी, प्रदेश सचिव इरफान शेख, युवती अध्यक्ष किरण नारायण माशाळकर, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, सायरा शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे रियाज शेख,यश अभय कुमार कांती, सचिन अंगडीकर, शहर संघटक माणिक कांबळे,वसंत कांबळे, महादेव राठोड,आनंद गाडेकर,अविनाश भडकुंबे आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या उद्देशाने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे.सोलापूर जिल्ह्याचे नूतन संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यास असून त्यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल. यापूर्वी देखील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विकासात्मक कार्य केले आहेत या पुढील काळात देखील विकासाच्या दृष्टीने ते प्रयत्न करतील अशी आशा यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोलापूर शहर जिल्ह्याचा दौरा करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचे उद्देश असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आगामी निवडणुकीत अव्वल स्थानी राहण्यासाठी आपला सोलापूर जिल्हा दौरा नियोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी नूतन संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने पक्ष बळकटीसाठी जोमाने कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी भरणे यांनी दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments