कर्जमाफीचा फसवा खेळ!
२०१७ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी गाजावाजा करून जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अजूनही शेतकऱ्यांच्या हाती आलेला नाही. आज पाच-सहा वर्ष उलटले, पण हजारो शेतकऱ्यांना त्याचे पैसे दिसलेच नाहीत. आता तर राज्याकडे त्या कर्जमाफीसाठी निधीच उरलेला नसल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर केला आहे.
ही परिस्थिती उघड झाल्यामुळे एकच प्रश्न सर्वत्र उपस्थित होतो – जर २०१७ च्या कर्जमाफीचीच ही अवस्था असेल, तर आज पुन्हा "सातबारा कोरा" होईल अशी स्वप्ने दाखवून शेतकऱ्यांना फसवले जात नाही ना? शेतकरी आधीच ओल्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत, पिकं उद्ध्वस्त झाली आहेत, हातात पैसा नाही, आणि त्यात सरकारकडून केवळ खोटे आश्वासन.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोस्टमध्ये थेट फडणवीसांवर बोट ठेवले गेले आहे – “मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस आहेत हीच शेतकऱ्यांसाठी नवी आपत्ती आहे”. म्हणजेच, पिकाला आभाळाचा धोका, आणि शेतकऱ्यांच्या भविष्याला मुख्यमंत्र्यांच्या खोट्या कर्जमाफीचं ओझं!
शेतकऱ्यांचा विश्वासघात, घोषणांचा गाजावाजा, आणि शेवटी निधीअभावी कर्जमाफीचा फज्जा. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आशेचं पाणी नाही, तर संतापाची ज्वाला आहे. सातबारा कोरा होण्याची स्वप्नं बघण्यापेक्षा शेतकऱ्यांनी आता सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणे बंद करावे, अशी वेळ आलेली आहे.
0 Comments