Hot Posts

6/recent/ticker-posts

धक्कादायक उघड! २०१७ च्या कर्जमाफीचा लाभ अजूनही थांबलेला, शेतकरी संभ्रमात

 धक्कादायक उघड! २०१७ च्या कर्जमाफीचा लाभ अजूनही थांबलेला, शेतकरी संभ्रमात



मुंबई (कटूसत्य वृत्त):- २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या थाटामाटात जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आजतागायत अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजवरून केलेल्या पोस्टमधून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, २०१७ च्या कर्जमाफीसाठी अजूनही शेतकरी प्रतीक्षेत आहेत आणि आता राज्य सरकारकडे तेवढे पैसे उपलब्धच नाहीत.

ओल्या दुष्काळाच्या संकटामुळे आधीच उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सातबारा कोरा होण्याची आशा मुळातच धूसर झाली असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. “२०१७ च्या कर्जमाफीची अवस्था अशी असेल तर यावेळी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण होईल, अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे,” असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने चढवला आहे.

दरम्यान, राज्यावर अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळाचे संकट गडद होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच बोट ठेवले जात आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, “मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस असणे हेच शेतकऱ्यांसाठी संकट अधिक गहिरं करणारे आहे.”

या संपूर्ण घडामोडीमुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठा संभ्रम आणि अविश्वास पसरला असून, जुनी कर्जमाफी अपूर्ण राहिल्याने नवी कर्जमाफी वास्तवात उतरेल का याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments