स्वच्छ व सुंदर सोलापूर” मोहिमेच्या अनुषंगाने आयुक्त डॉ. ओम्बासे यांची पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज “स्वच्छ व सुंदर सोलापूर” या मोहिमेच्या अनुषंगाने शहरातील विविध भागांची पाहणी केली. शहरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन तसेच सौंदर्यवर्धन या दृष्टीने आयुक्तांनी विविध भागाना भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या पाहणी दरम्यान आयुक्तांनी जुना एम्प्लॉयमेंट चौक, डीआरएम ऑफिस परिसर, विद्याविहार, दर्बी कलेक्शन बोळ, सात रस्ता परिसर, बिग बाजार, मोदी चर्चा व मासीहा चौक या भागांचा आढावा घेतला.
पाहणी दरम्यान आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी पुढील बाबींसाठी स्पष्ट सूचना दिल्या —
रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत तातडीने काढण्यात यावे.
जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील नाल्याच्या परिसरातील कचरा हटवून परिसर स्वच्छ ठेवावा.
रस्त्यावर बांधकाम साहित्य, बांधकामाचे आजोरा आहे अश्या ठिकाणी दंड करण्यात यावा,चहाचे व नाष्ट्याचे टपरीधारक यांनी केलेले अतिक्रमण तातडीने दूर करण्यात यावे.
सरकारी मैदान व मोकळ्या जागांवरील वाढलेले गवत कापून स्वच्छता राखावी.
सात रस्ता परिसरातील फुल विक्रेत्यांचे अतिक्रमण तसेच रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गॅरेजमधील गाड्या हटवाव्यात.
आयुक्तांनी संबंधित विभागांना निर्देश दिले की, रस्त्यांच्या कडेने, नाल्यांच्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी व फुटपाथवर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही. नियमितपणे स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून शहर स्वच्छ, सुंदर व अडथळेमुक्त ठेवण्यावर भर द्यावा.
या पाहणीदरम्यान उपायुक्त तैमूर मुलाणी, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपण डंके, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, उद्यान विभागाचे कर्मचारी तसेच अतिक्रमण निर्मूलन पथक उपस्थित होते.
0 Comments