ऑर्किडच्या शिक्षकांसाठी सीबीएसई शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नामांकित अशी सीबीएसई स्कुल म्हणून नावलौलिक प्राप्त झालेल्या नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये शिक्षक वर्गासाठी सीबीएसई कडुन 'ज्ञानाचे सिद्धांत' या विषयावर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन संगमेश्वर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या प्रियांका समुद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्कुलच्या प्राचार्या रुपाली हजारे,अक्षता रायकर उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण शिबिरात स्कुलमधील 60 शिक्षकांनी सहभाग नोंदविला.यामध्ये प्रमुख मार्गदर्शिका प्रियांका समुद्रे व अक्षता रायकर यांनी ज्ञान व शिक्षण या दोन्ही मधील आधुनिक बदल याविषयी शिक्षकांना इत्थंभूत अशी माहिती दिली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी,संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते, स्कुलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी,स्कुलच्या मार्गदर्शिका मीना पारखे यांनी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत ठेविण्यासाठी मदत केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीदेवी कनके यांनी केले. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
.jpg)
0 Comments