गावाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार- खा. प्रणिती शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त शिवणी गावाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी ग्रामस्थांनी खासदार शिंदे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना सांगितले की, अलीकडील पुरामुळे गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेती, घरे, जनावरे आणि पिकांचे नुकसान होऊन लोकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करण्यात यावे आणि शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने ती वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच सांगलीप्रमाणे नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी करण्यात आली.
खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत सांगितले की, “शिवणी गावाचे पुनर्वसन करण्यासाठी मी ठोस प्रयत्न करणार आहे. शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून वाढीव आर्थिक मदतीची मागणी आम्ही सातत्याने करणार आहोत,” असे त्या म्हणाल्या.
पूरग्रस्तांच्या समस्या तत्काळ सोडवून मदत कार्य वेगात सुरू करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी प्रशासनाकडे केली.
यावेळी सरपंच शशिकांत खवसोडे, सचिन गुंड, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, राजकुमार गुंड, अशोक गुंड, रायबा गुंड, अशोक गुंड, लखन गुंड, विष्णू गुंड, रुक्मत गुंड, नारायण कायत, गौतम खवसोडे, सरूबाई खवसोडे यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments