वसंत मिस्कर यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- रेडे (ता.माळशिरस) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वसंत मिस्कर यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने नुकताच सत्कार करण्यात आला.रेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वसंत मिस्कर हे नियत वयोमनानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.त्यानिमित्ताने रेडे येथील ग्रामस्थ व ग्रामशिक्षण समितीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या हस्ते श्री.मिस्कर यांचा सत्कार करण्यात आला.वसंत मिस्कर यांनी सुरुवातीला उपशिक्षक म्हणून महिम(ता.सांगोला), तांदूळवाडी(ता.माळशिरस),गार्डी( ता. पंढरपूर)आदी भागातील प्राथमिक शाळांमध्ये काम केले आहे. रेडे येथील प्राथमिक शाळेत काम करत असताना शाळेच्या विकासात मुख्याध्यापक श्री. मिस्कर यांनी योगदान दिले आहे.या सत्कार कार्यक्रमास सरपंच सचिन काळे, उपसरपंच आनंद शेंडगे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुर्योधन शेंडगे,ग्रामपंचायत सदस्य पोपट दडस, सूर्यकांत शेंडगे,ग्रामविकास अधिकारी राजकुमार काळे,प्राथमिक शिक्षक जिल्हा पतसंस्थेचे संचालक रवींद्र पाटील,ऋषिकेश शेंडगे,आप्पा शेंडगे, उपशिक्षक श्री.महामुनी,चांगदेव पवार, दिलीप पवार,श्रीमती चव्हाण, अंगणवाडी सेविका धाईंजे आदी उपस्थित होते.
0 Comments