Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या वतीने सभासद, ऊसपुरवठादार शेतकरी, कामगार यांना साखर विक्री सुरू

 श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या वतीने सभासद, ऊसपुरवठादार शेतकरी, कामगार यांना साखर विक्री सुरू




वेणुनगर (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणानिमित्त सर्व सभासद, ऊसपुरवठादार शेतकरी व कामगार यांना २५ किलो साखर रू. ३०/- प्रती किलो याप्रमाणे वाटपाचे धोरण मा.संचालक मंडळाने जाहीर केले होते, त्याप्रमाणे गुरुवार दि.०९.१०.२०२५ पासून कारखाना साईटवर व पंढरपूर शहरामध्ये समृध्दी ट्रॅक्टर शोरुम शेजारी, कॉलेज रोड, पंढरपूर येथेही साखरेचे वाटप चालू केलेले आहे. तसेच माढा भागातील ऊस पुरवठादार शेतकरी यांना माढा साखर वाटप केंद्र, लऊळ व टेंभुर्णी येथील साखर वाटप केंद्रातुन साखरेचे वाटप चालु करण्यात आलेले आहे. सदर साखर वाटपाच्या पंढरपूर येथील केंद्राचे उद्घाटन काशिद रावसाहेब, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन व आर.बी.जाधव, चेअरमन, निशिगंधा बँक, पंढरपूर, अॅड. अरविंद पाटील व श्री विठ्ठल कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकर चव्हाण व विठ्ठल पाटील, महेश घाडगे, सेल्स ऑफीसर यांचे शुभहस्ते करण्यात आले. तसेच कारखाना साईटवरील साखर वाटप केंद्राचे उद्घाटन संचालक प्रविण कोळेकर व ओमकार अवधुत, लिगल ऑफीसर, शाम शिंदे, ऊसपुरवठा अधिकारी, कर्पे डे. चिफ अकौंटंट यांचे हस्ते करण्यात आले. गेटकेन भागातील साखर विक्री केंद्र टेंभुर्णीचे उद्घाटन संचालक दत्तात्रय नरसाळे, रावसाहेब नाना देशमुख, औदुंबरभाऊ देशमुख, चेअरमन, डीव्हीपी बँक, प्रमोद कुटे, माजी सरपंच टेंभुर्णी, भागवततात्या खडके, मा. सरपंच, चव्हाणवाडी, विठ्ठल नवले, आबासाहेब वाघ, केन मॅनेजर व लऊळ येथील साखर वाटप केंद्राचे उद्घाटन निलेशबापु पाटील, सहिल घुगे, विकास गाडे, समाधान रजपुत, रोकडे, शेती अधिकारी तसेच माढा येथील साखर वाटप केंद्राचे उद्घाटन संदिप खारे, संचालक, धाराशिव कारखाना, राजाभाऊ चवरे, माजी संचालक, दुध संघ, दिनेश जगदाळे, आबासो साठे, हरिकाका चवरे, मियाँसाहेब कोरबू, संजय भोगे व किरण पवार इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करणेत आले.
तसेच सभासद व ऊसपुरवठादार यांना दिपावली सणासाठी वेळेत साखर मिळावी म्हणून साखर वाटप करण्याचे योग्य नियोजन केलेले आहे. कारखाना साईट व पंढरपूर येथील साखर दुकान दि.०९.१०.२०२५ ते दि.१५.११.२०२५ पर्यंत चालु राहिल व गेटकेन विभागातील साखर वाटप केंद्र दि.०९.१०.२०२५ ते दि.१८.१०.२०२५ पर्यंत चालु राहिल. त्याप्रमाणे सर्वांनी त्यांच्या नेमुन दिलेल्या केंद्रातून साखर घेण्यात यावी. सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे संचालक, तसेच सर्व अधिकारी, सभासद व कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments