Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवामृतच्या उपपदार्थांना देशात विदेशात चांगली मागणी - खा. मोहिते पाटील

 शिवामृतच्या उपपदार्थांना देशात विदेशात चांगली मागणी - खा. मोहिते पाटील





अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या पेढा, बर्फी, गुलाबजामून व इतर उपपदार्थांना देशात व विदेशात चांगली मागणी असून ऑनलाइन विक्री होत असल्याची माहिती  शिवामृत दूध सहकारी संघाचे  अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिली.
      संघाच्या सुवर्णमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. शिवामृतच्या येथे मंगळवारी, सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी संघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील, सहकारमहर्षी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, शिवामृत दूध संघाचे सर्व संचालक, सभासद, कार्यकारी संचालक रविराज इनामदार उपस्थित होते.
        खासदार मोहिते-पाटील पुढे म्हणाले, लवकरच आपल्या दूध संघाचा मिल्क पावडर प्लान्ट सुरु होईल. त्यामुळे सर्व सभासद, संकलक व दूध पुरवठादार संस्थानी मोठ्या क्षमतेने दूध वाढवावे.
     प्रास्ताविक दूध संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांनी करून संघाच्या प्रगतीची माहिती दिली. तर विषय वाचन कार्यकारी संचालक इनामदार यांनी केले. सभासदांनी सर्व विषयांना एकमुखाने मंजुरी दिली.
      याप्रसंगी गत ५० वर्षांपासून सलग शिवामृतला दूध पुरवठा करणाऱ्या सेंटर व संस्था, पशुखाद्य खरेदीमध्ये अव्वल असणाऱ्या संस्था, सेंटर चालकांचा गौरव करण्यात आला. तर जनरल चॅम्पियनशिप शिवामृत दूध संघ, कोंडबावी यांना देण्यात आली.

Reactions

Post a Comment

0 Comments