मराठा मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाज सेवा मंडळा अंतर्गत सर्व रोपट्यांचा आज वटवृक्ष झाले असून या पुढील काळात समाज बांधव आणि नूतन पदाधिकाऱ्याने वाढवलेल्या वृक्षाचे जतन होणे महत्त्वाचे आहे असे मत एडवोकेट नागनाथ शिंदे यांनी व्यक्त केले
मराठा समाज सेवा मंडळाच्या वार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार एडवोकेट शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी एडवोकेट गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खराटमल आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुजाता जुगदार यांनी केले यावेळी एडवोकेट देशमुख यांनी आपल्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडल्याचे सांगितले तसेच प्रभारी कुलसचिव डॉ.अतुल लकडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या
यावेळी संस्थेचे नूतन अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे, जनरल सेक्रेटरी प्रा. महेश माने खजिनदार महादेव गवळी सचिव माजी प्राचार्य राजेंद्र शिंदे यांच्यासह विनायकराव पाटील, नागेश हावळे,नीलकंठ वाघचौरे CA, शिवदास चटके सर, उद्योगपती मुकुंद जाधव माजी प्राचार्य डॉ. सुरेश पवार,प्रभाकर खंडाळकर, अशोक चव्हाण, मंगेश जाधव आणि अलका सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सपाटे यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन यापुढे संस्थेचा अधिक चांगल्या प्रकारे दिमागदार कारभार करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमास मुख्या. तानाजी माने उदयसिंह पवार, किशोर बनसोडे, नामदेव थोरात,रेखाताई सपाटे प्रा. प्रकाश भोसले, विलास जाधव,मोहम्मद शेख, उषा गोकुळे, माधवी कांबळे,दत्ता भोसले, दीपक डुरे पाटील आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका महामुनी पंडित मॅडम आणि आभार प्राचार्य डॉ. अरुण मित्रगोत्री यांनी मानले.
0 Comments