नातेपुते महाविद्यालयातील समर्थ कोकरे याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर,श्रीगोंदा क्रीडा समिती व अहिल्यानगर जिल्हा कुस्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने काष्ठी येथील शैक्षणिक संकुल परिक्रमा आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज या ठिकाणी मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शालेय पुणे विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी समर्थ चंद्रकांत कोकरे यांनी १९ वर्ष वयोगटामध्ये ९२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्याच्या या निवडीमुळे महाविद्यालयाचे नाव उंचावले असून संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील, संस्थेचे मार्गदर्शक तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील संचालिका उर्वशीराजे मोहिते पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. बी टी निकम, पर्यवेक्षक बी टी वाघमोडे,
एन.आय.एस. कुस्ती कोच प्रा. नारायण माने यांनी त्याचे अभिनंदन करून त्याला पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूला एन.आय.एस. कुस्ती कोच प्राध्यापक पैलवान नारायण माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments