सीना नदीच्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यात NDRF व लष्कर पथकांची नियुक्ती
- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्प तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी सीना नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पुराचा धोका निर्माण झाला आहे.
भारतीय हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी व मंद्रुप (दक्षिण सोलापूर) तालुक्यांमध्ये पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी तातडीने शोध व बचाव कार्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे.
नियुक्त पथकांची माहिती पुढीलप्रमाणे : - NDRF पथक – माढा तालुका : सुलतानपूर व राहूलनगर गावे
- लष्कर पथक – माढा तालुका : दारफळ गाव
सदर पथकांनी संबंधित गावांमध्ये शोध व बचाव कार्यासाठी समन्वय साधून काम करावे, तसेच तहसीलदारांकडून पूरस्थितीची अद्ययावत माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. पुढील ठिकाणांची नियुक्ती जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार वेळोवेळी करण्यात येईल.
* सोलापूर जिल्ह्यात शोध आणि बचाव कार्यासाठी सैन्याची आवश्यकता आहे. म्हणूनच, याच पार्श्वभूमीवर, भारतीय सैन्याची ०१ (एक) टीम शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवावी, अशी विनंती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आर्मीच्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) मुख्यालय यांना केली होती, त्यानुसार भारतीय सैन्याचे पथक येत आहे. त्याचप्रमाणे एन डी आर एफ चे दोन पथक माढा तालुक्यात बजावाचे कार्य करत असून आणखी एक पथक जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नातून मिळणार आहे. तरी जिल्ह्यात NDRF चे तीन पदके शोध व बचावाच्या कार्यात भाग घेतील.

0 Comments