शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी च्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रणजीत आण्णा सूळ कॉम्प्लेक्स, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक धर्मपुरी (बंगला), ता.माळशिरस या ठिकाणी
मोफत आरोग्य शिबिर व चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प. सदस्या ऋतुजाताई शरद मोरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमामध्ये मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी) यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट), डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना) कॅन्सर तपासणी,
रक्त तपासणी, मेंदूचे आजार तपासणी व शस्त्रक्रिया मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया इत्यादी वरील सर्व आजारांच्या मोफत तपासण्याचा लाभ परिसरातील ५०० नागरिकांनी घेतला. त्या ठिकाणी मोठया प्रमाणात चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशलिस्ट यांच्यातर्फे लता मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.यावेळी
शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद (बापु) मोरे मा.जि.प. सदस्या ऋतुजाताई शरद मोरे,अण्णा सूळ, भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर, किशोर सूळ, शुभम सूळ, भारत सूळ, तुषार पाटील, वैभव मोरे, सुशांत पाटील, अमर रणवरे, तेजस मोरे, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातीली नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments