Hot Posts

6/recent/ticker-posts

शरद पवार गटाचे ठाण्याचे माजी नगरसेवक अमित सरैय्या यांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

 शरद पवार गटाचे ठाण्याचे माजी नगरसेवक अमित सरैय्या यांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश


 (कटूसत्य वृत्त):-भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
 
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ठाण्याचे माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.  प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ठाण्याचे आ. संजय केळकरआ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटीलमाधवी नाईकठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेलेसंजय वाघुलेमाध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. 
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या आणि राज्याच्या विकासाने नवी उंची गाठली आहे. भाजपाची धोरणे आणि विचारधारेवर विश्वास ठेवून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही. सावरकर नगर प्रभागातील सक्रीय आणि प्रभावी नेतृत्व असलेल्या श्री. सरैय्या यांच्या प्रवेशामुळे त्या भागात भाजपाची ताकद वाढणार आहे. प्रवेश केलेल्या सर्वांच्या पाठीशी पक्ष संघटना खंबीरपणे उभी राहील. ठाणे शहरामध्ये  विकास कामांना गती देण्यात येईल. आपण सर्वांनी मिळून प्रभाग जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा आहेअसे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले.
प्रभागाच्या विकासासाठी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असे श्री. सरैय्या म्हणाले. भाजपाने दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरेन आणि प्रभाग क्र. 14 आणि 15 मध्ये भाजपा वाढवण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्व पदाधिका-यांना सोबत घेऊन ठाणे शहरात भाजपाला अव्वल क्रमांकावर नेऊ असा विश्वास यावेळी संदीप लेले यांनी व्यक्त केला. 
ठाण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये प्रभाग अध्यक्षमहिला आघाडी कार्याध्यक्षब्लॉक अध्यक्षब्लॉक उपाध्यक्षसचिवसरचिटणीस आदींचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 14 चे अध्यक्ष महेंद्र इथापेअध्यक्षा शैलजा पवारशुभांगी लोकेसुजाता घागरुक्मणी पाटीलप्रभाग क्रमांक 15 चे अध्यक्ष निनाद रांगणकरयुवक वॉर्ड प्रभाग क्रमांक 14 चे अध्यक्ष ओम सिंगअध्यक्षा अफसाना शेखकोपरी पाचपाखाडी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा सुजाता गवळीलोकमान्य- सावरकर नगरच्या ब्लॉक अध्यक्षा प्रियांका रोकडे यांचा समावेश आहे. शिवसेना उबाठा गटातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये ब्लॉक संघटक सचिव बिंदू पटवइंदिरा नगरचे शाखाप्रमुख अजीम मकबूल अहमद खानआंबेवाडीचे शाखाप्रमुख आकाश जैस्वालकोपरी पाचपाखाडी विधानसभेचे युवासेना समन्वयक चंद्रेश यादवउप समन्वयक धर्मेश गुप्ता यांचा समावेश आहे.
उल्हासनगर येथील विविध पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आ. कुमार आयलानी, उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वदरीया उपस्थित होते. माजी नगरसेवक प्रभुनाथ गुप्तासंजय सिंगछाया अडसूळ, मंगल वाघेहेमा पिंजानीसुचित्रा सिंग, शरद झाकिसन लांछानीसूरज बालवानी आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला.
 
Reactions

Post a Comment

0 Comments