Hot Posts

6/recent/ticker-posts

पतसंस्थेने आर्थिक मदत केल्यामुळे अनेक तरुण उद्योग व्यवसायात : रघुनाथराव ( अण्णा ) कवितके

 पतसंस्थेने आर्थिक मदत केल्यामुळे अनेक तरुण उद्योग व्यवसायात : रघुनाथराव ( अण्णा ) कवितके




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- ३३ वर्षांपूर्वी संस्था स्थापन करणे फार जिकरीचे होते. परंतु सर्वांनी सहकार्य केल्यामुळे ही संस्था उभा राहू शकली आज पतसंस्थेचे भाग भांडवल ३० लाख आहे.ठेवी साडेतीन कोटी तर गुंतवणूक दीड कोटी व कर्ज वाटप तीन कोटी केले आहे.खेळते भांडवल साडेचार कोटी आहे. इतर राखीव निधी ७१ लाख व  निव्वळ नफा ६ लाख १६ हजार एवढा झाला आहे  पतसंस्थेच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक मदत केल्यामुळे मोठ्या उद्योग व्यवसायात असल्याचे  प्रतिपादन संस्थेचे संस्थापक रघुनाथराव (अण्णा ) कवितके यांनी व्यक्त केले ते कवितके सांस्कृतिक भवन येथे अहिल्यादेवी पतसंस्थेच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, अहिल्यादेवी पतसंस्थेचे व्हॉ. चेअरमन अमोल उराडे, चंद्रप्रभू पतसंस्थेचे चेअरमन राजेश चंकेश्वरा,दिलीप घुगरदरे, नगराध्यक्षा अनिता लांडगे, धुळदेव पतसंस्थेचे अध्यक्ष डी. एन. काळे, अँड. शिवाजीराव पिसाळ, हनुमंतराव ढालपे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पतसंस्थेचे सचिव रवींद्र ठोंबरे यांनी वार्षिक लेखाजोखा मांडला  असून प्रास्ताविक अॅड. भारत उराडे यांनी केले व आभार रवींद्र ठोंबरे यांनी मानले. पतसंस्थेच्या सभेसाठी संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, पिग्मी एजंट तसेच कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी :

अध्यक्षस्थानी बोलत असताना संस्थेचे संस्थापक रघुनाथराव (अण्णा ) कवितके 

Reactions

Post a Comment

0 Comments